आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमालिया : हॉटलच्या बाहेर बाँबस्फोट , एका खासदारासह 15 जणांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यात खासदारासह 15 व्‍यक्‍ती ठार झाल्‍यात. - Divya Marathi
यात खासदारासह 15 व्‍यक्‍ती ठार झाल्‍यात.
मोगदिशू- सोमालियाच्या राजधानीतील शहाफी नावाच्‍या हॉटेलमध्‍ये आज (रविवार) आज दुपारी दोन बाँबस्फोट झाले. यात खासदारासह 15 व्‍यक्‍ती ठार झाल्‍यात. मृतांमध्‍ये राजकीय व्‍यक्‍ती आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती स्‍थानिक पोलिसांनी दिली. दरम्‍यान, हल्‍ल्‍याची भीषणता पाहात मृतांची संख्‍या वाढू शकते.
अशी घडली घटना
हॉटेलच्‍या मुख्‍य दारातून एक एक कार आत आली आणि स्‍फोट झाला. यात राजकीय नेते आणि अधिकारी ठार झाले, अशी माहिती पोलिस अधिकारी मेजर अहमद नूर यांनी दिली.

अल शबाबने घेतली हल्‍ल्‍याची जबाबदारी
या हल्‍ल्‍याची जबाबदारी अल शबाब या दहशतवादी संघटनेने घेतली. या संघटनेचा प्रवक्‍ता अब्दियासिस अबू मुसाब याने म्‍हटले, "आमच्‍या जवानांनी सहाफी हॉटलवर ताबा मिळवला आहे. या ठिकाणी आमचे शत्रू राहतात'' असे तो म्‍हणाला.,

हॉटेल आहे उच्‍चभ्रू वस्‍तीत
ही हॉटेल के-4 या उच्‍चभ्रू वस्‍तीमध्‍ये आहे. या ठिकाणी खासदार आणि सरकारी अधिकारी यांचे नेहमी ये-जा असते. आम्‍ही हॉटेलच्‍या मागील दारातून अनेक नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. पण, जखमींची संख्‍या मोठी आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...