आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिलिपाइन्सच्या रस्त्यांवर मृत्यूचे तांडव, अमली पदार्थविरोधी अभियानात ६,००० पेक्षा अधिक व्यक्ती मारले गेले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेश जेनकिन्स/मनिला- केलुकन शहरात ईश्वर नाही. कमीत कमी आजच्या रात्री तरी नाहीच. मनिलाच्या या गलिच्छ वस्तीमध्ये कॅथॉलिक चर्चची वीज बंद आहे. धुवाधार पाऊस आणि हवा. मात्र, येथील दुर्गंधी मिटवण्यासाठी हेदेखील अपुरेच. रात्रीचे दोन वाजले आहेत. कोपऱ्यातील एका दुकानाच्या पत्र्याच्या भिंतीवर हाताने लिहिले आहे, अमली पदार्थांपासून दूर राहा. क्रीडा क्षेत्रात रस घ्या.
  
चिखलाने बरबटलेल्या गल्लीत पोलिस अधिकारी काँक्रीटच्या पायऱ्या चढून एका अरुंद गल्लीत पोहोचतो. तेथे एक मृतदेह पडलाय. डिसेंबरमध्ये एका काळरात्री मनिलामध्ये पाच जणांचा निर्घृण खून झाला होता. त्यापैकी हा एकाचा मृतदेह. अमली पदार्थविरोधी राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्तेंच्या अभियानाचा हा परिणाम होता. वस्तीमध्ये घरांची रांग परस्परांत गुंतली आहे. मात्र, गोळ्यांचा आवाज येताच कोणातही बाहेर पडण्याची टाप नव्हती. 
 
गेल्या वर्षी जूनमध्ये दुतेर्ते यांनी सत्तासूत्रे स्वीकारली. त्यानंतर फिलिपाइन्समध्ये अवैध अमली पदार्थांच्या विरुद्ध अभियान सुरू झाले. यात ६००० लोकांचा बळी गेला. सर्वांना रात्री ठार करण्यात आले आहे. यांना ठार करणाऱ्यांमध्ये स्वयंघोषित गस्तीस येणारे सदस्य, सुपारी दिलेले खुनी आणि पोलिस सामील आहेत. दुतेर्ते आपल्या धोरणांना लपवत नाहीत. ते २२ वर्षे दवाआे शहराचे महापौर होते. त्यांच्या शासनकाळात अपराधी, अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचे खून धोरणाचा भाग होते.  काही व्यापाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी मान्य केले की, ते महापौर असताना त्यांनी अनेकांना कंठस्नान घातले आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार कमिशनचे आयुक्त जिद राद अल हुसैन यांच्या मते यासाठी दुतेर्तेंची चौकशी झाली पाहिजे. डिसेंबरमध्ये झालेल्या सर्व्हेनुसार ७७% फिलिपिनी नागरिक दुतेर्तेंच्या कामावर खुश आहेत. डेटिंग अॅप टिंडरवर महिलांनी आपल्या फोटोवर लिहिले आहे की, मी फिलिपिनी आहे आणि दुतेर्ते माझे राष्ट्राध्यक्ष आहेत.  

२०१६ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत दुतेर्तेंना बलशाली उमेदवार मानले गेले नव्हते. मात्र, अमली पदार्थांच्या महामारीला सामाजिक, राजकीय व्यवस्थेसाठी नुकसानदायक मानणाऱ्या फिलिपिनी नागरिकांनी त्यांना समर्थन दिले. लोकांना त्यांची दृढता आवडते. फिलिपिनींच्या स्थिती फार चांगली आहे असे नाही. २०१३ मध्ये तेथे खुनांची संख्या आशियात सर्वाधिक होती. देशाच्या जीडीपीत ७.८ % हिस्सा असलेला पर्यटन उद्योग संकटात होता.
बातम्या आणखी आहेत...