आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Death Row Iran Child Inmates Facing Execution In Photos

सनातनी इराणमधील मुलींच्या सुधारगृहाची भयावह स्थिती, समोर आली छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला कैद्यांना केवळ दोन वर्षांचे मुल आपल्याबरोबर ठेवण्‍याची परवानगी आहे. 14 वर्षांची असताना झाहराचा विवाहा झाला. तिला दोन मुले आहेत. झाहरा आता 17 वर्षांची आहे. मोबाइल फोन चोरी करण्‍याच्या आरोपा खाली तिला शिक्षा झाली आहे. - Divya Marathi
महिला कैद्यांना केवळ दोन वर्षांचे मुल आपल्याबरोबर ठेवण्‍याची परवानगी आहे. 14 वर्षांची असताना झाहराचा विवाहा झाला. तिला दोन मुले आहेत. झाहरा आता 17 वर्षांची आहे. मोबाइल फोन चोरी करण्‍याच्या आरोपा खाली तिला शिक्षा झाली आहे.
इराणच्या बाल सुधारगृहाची छायाचित्रे समोर आली आहेत. यात मुली अस्वच्छ ठिकाणी झोपलेल्या, खाण्‍यासाठी तासन् तास रांगेत उभे राहलेल्या आणि नवजात मुलांची देखभाल करताना त्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे दिसत आहे. सादेह सूरी नावाच्या पुरस्कार विजेत्या छायाचित्रकारांने छायाचित्रे आपल्या कॅमे-यात टिपली आहेत. त्यास त्यांनी 'वेटिंग फॉर कॅपिटल पनिश्‍मेंट' असे शीर्षक दिले आहे.
समोर आले सुधारगृहातील कटू सत्य...
- वृत्त संकेतस्थळ डेली मेलनुसार, येथे अनेक बाल गुन्हेगार खून, अंमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रांची चोरी आदी गुन्ह्यांसाठी मृत्यूची वाट पाहात आहेत.
- वृत्तानुसार, येथे कैद्यांची छळवणूक करुन त्यांच्याकडून जबरदस्तीने साक्ष नोंदवले जाऊन त्यांना फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते.
- इराणमध्‍ये नऊ वर्षांच्या मुलीलाही फाशी देण्‍याची तरतूद आहे.
- हा जगातील दुसरा असा देश आहे जिथे सर्वाधिक मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाते.
मानवाधिकार संघटनेचा भयावह खुलासा
- अॅमेनेस्टी इंटरनॅशनलनुसार, इराणमध्‍ये 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे सुमारे 160 युवा वर्ग फाशीच्या प्र‍तीक्षेत आहेत.
- 2005-15 दरम्यान 73 जणांना फाशी दिली गेली आहे. 2015 मध्‍ये येथे सर्वाधिक मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली गेली.
- एक जानेवारी पासून नोव्हेंबर 2015 पर्यंत 830 लोकांना फाशी देण्‍यात आली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मुलीचे सुधारगृहाची छायाचित्रे...