आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटनमध्ये वाद, देवाला स्त्री म्हणावे की पुरुष?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनमध्ये गॉडला (देव) पुरुष म्हणावे की स्त्री, या मुद्द्यावरून वाद पेटला आहे. गॉडसाठी 'ही' (He) लिहिले जावे की 'शी' (She) असा सवाल येथील महिला पाद्रींनी केला आहे. त्याबाबत रविवारी कँटरबरीच्या आर्चबिशपांच्या घरी बैठक झाली. महिला पाद्रींची इच्छा आहे की, प्रार्थना बदलली जावी तसेच त्यात "ही'च्या जागी "शी' लिहिले जावे. जेणेकरून महिलांनाही बरोबरीचा दर्जा मिळू शकेल. त्यांनी बुक ऑफ कॉमन प्रेयर ही पितृसत्तात्मक असल्याचे म्हटले आहे.

गॉडसाठी फक्त "ही' लिहिले जात असल्याने महिलांत न्यूनतेची भावना निर्माण होऊ शकते, असे महिला पाद्रींनी म्हटले आहे. ऑक्सफोर्डच्या ट्रिनिटी कॉलेजमधील महिला पाद्री रेव्ह एमा पर्सी म्हणाल्या, जेव्हा आम्ही गॉडला पुरुष संबोधणारे शब्द वापरतो तेव्हा देव हा पुरुषासारखा असून पुरुष देवासारखा असल्याचे वाटते. म्हणजेच या जगातील महिला ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व करू शकत नाही.