आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत नव्या जजच्या नियुक्तीचा वाद पेटला, न्यायमूर्ती पदासाठी भारतीय वंशाचे श्रीकांत शर्यतीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अँटोनीन स्कलिया(७९) यांचे शनिवारी रात्री झोपेत निधन झाले. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात ते इटालियन वंशाचे पहिले न्यायमूर्ती होते. त्यांच्याजागी भारतीय वंशाचे श्रीकांत श्री श्रीनिवासन(४८) यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.मात्र, नवे राष्ट्राध्यक्ष विराजमान होण्यास केवळ ११ महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत नव्या नियुक्तीचा मुद्दा वादात अडकला आहे. तथापि, राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नव्या न्यायमूर्तींची नियुक्त करणार असल्याचे संकेत दिले आहेत. परंतु उमेदवारीच्या शर्यतीतील सर्व रिपब्लिकन नेत्यांनी नवे राष्ट्राध्यक्ष येईपर्यंत नियुक्ती केली जाऊ नये,अशी मागणी केली आहे.

अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात एकदा नियुक्ती झाल्यानंतर न्यायमूर्ती आजीवन त्या पदावर राहतात. त्यांना केवळ मृत्यू, राजीनामा किंवा महाभियोगाद्वारे पदावर दूर केले जाऊ शकते. त्यामुळे कोणतेही पद रिक्त झाल्यास राष्ट्राध्यक्ष आपल्या आवडीच्या आणि विचाराच्या न्यायमूर्तीची नियुक्तीसाठी घाई करतात.