आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपुऱ्या झाेपेमुळे घटते कार्यक्षमता, त्यामुळे दरवर्षी जीडीपीच्या 2 टक्क्यांएवढे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुगल कार्यालयात हायटेक स्लीप पॉड लावलेले अाहेत. - Divya Marathi
गुगल कार्यालयात हायटेक स्लीप पॉड लावलेले अाहेत.

लंडन- कर्मचाऱ्यांना अधिक क्षमतेने व दर्जेदार काम करता यावे म्हणून आता अनेक कंपन्या ऑफिसमध्ये ‘नॅप टाइम’ अर्थात डुलकी घेण्यासाठी विशेष वेळ देत आहेत. काही कंपन्यांनी तर यासाठी ऑफिसमध्येच खास स्लीप पॅड तयार केले असून याचा संबंध थेट अर्थव्यवस्थेशी जोडला गेला आहे. झोप कमी झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीवर याचा परिणाम होत आहेच, शिवाय अर्थव्यवस्थेलाही याचा फटका सहन करावा लागत आहे. कमी झोप झाल्याने घटलेल्या क्षमतेमुळे दरवर्षी जीडीपीमध्ये होणारे नुकसान सुमारे २% ब्रिटनच्या स्लीप फाऊंडेशनने ही माहिती दिली.


फाउंडेशनच्या ताज्या सर्वेक्षणात काही ठळक गोष्टी समोर आल्या. यात सरासरी वयस्कर ब्रिटिश ६.४९ तासच झोप घेऊ शकत आहेत. अमेरिकेत ही वेळ ६.३१ तास तर जपानमध्ये ६.२२ तास आहे. वास्तविक ७ ते ९ तासांची झोप उत्तम प्रकृ़तीसाठी महत्त्वाची मानली जाते. एकट्या ब्रिटनला यामुळे सुमारे ४० दशलक्ष पौंडाचा फटका बसला आहे. ‘व्हाय वुई स्लीम : द न्यू सायन्स ऑफ स्लीप अँड ड्रीम्स’चे लेखक मॅथ्यू वॉकर यांच्यानुसार, १९४२ मध्ये गॅलप सर्व्हेनुसार ज्येष्ठांची झोपेची एकूण वेळ सरासरी ८ तास होती. म्हणजेच आता झोपेची वेळ अत्यंत कमी झाली आहे. संपूर्ण जगाला आज ही समस्या भेडसावत आहे. अधिक वेळ काम हे यातील महत्त्वाचे कारण आहे. वॉकर म्हणतात, म्हणूनच कंपन्यांनी धोरण आखले आहे. गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खास स्लीप पॅड लावले आहेत. यात हायटेक अंथरुणासह सोबत शांत सुमधुर संगीतही आहे. नाइकीच्या पोर्टलँडस्थित कार्यालयात झोप व योगासाठी खास खोल्या आहेत. पीअँडजीने आपल्या ऑफिसमध्ये मेलाटोनिन (झोप आणणारा हार्मोन) नियंत्रित करणारी प्रकाश योजना लावली आहे. वॉकर म्हणतात, यापेक्षा स्लीप पॅड हा चांगला पर्याय ठरू शकतो. आता जगभर विविध कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा देण्यासाठी सरसावल्या आहेत.

 

कमी झोप घेणाऱ्या यशस्वी लोकांचे अनुकरण करणे चुकीचे

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, यशस्वी लाेक कमी झाेपेचे समर्थन करतात. जसे टिम कुक पहाटे ५ वाजता जिमला जातात. मारिसा मायर फक्त ४ तासच झाेपते. डायरेक्टर टाॅम फाेर्डही तीन तासच झाेपतात. या यशस्वी व्यक्तींचे पाहून इतर लाेकही त्यांचे अनुकरण करू लागतात. इथूनच अाराेग्य समस्यांना सुरुवात हाेते. प्रत्येकाला पुरेशी झाेप अावश्यक असतेच. हफिंगटन पोस्टच्या संस्थापक एरियाना हफिंगटन दहा वर्षे या समस्येला ताेंड देत हाेत्या. अाता त्या सावरल्या अाहेत. त्यांनी या विषयावर ‘स्लीप रिव्हाॅल्यूशन’ नावाचे पुस्तक लिहिले अाहे. या पुस्तकात कामाच्या ठिकाणी निराेगी वातावरण कसे ठेवले पाहिजे, याबाबत टिप्स दिलेल्या अाहेत.

बातम्या आणखी आहेत...