आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आजपासून दोन दिवस बांगलादेशच्या भेटीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर बुधवारपासून बांगलादेशच्या दोनदिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. सुरक्षा व दहशतवादाच्या समस्येवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर पंतप्रधान शेख हसीना पुढील महिन्यात भारत भेटीवर येणार आहेत.
बांगलादेशला भेट देणारे पर्रीकर हे भारताचे पहिलेच संरक्षणमंत्री आहेत. राष्ट्राध्यक्ष अब्दुल हमीद यांच्याशी त्यांची चर्चा होईल. त्याशिवाय पंतप्रधानांच्या सुरक्षा सल्लागारांशीदेखील त्यांची चर्चा होणार आहे. पर्रीकर यांच्यासोबत हवाई, नौदल, तटरक्षक यांच्या उच्चाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळही असेल. चित्तागाँग येथील लष्करी अॅकॅडमीला पर्रीकर भेट देतील. त्यानंतर ते पंतप्रधान हसीना यांच्याशी विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, चीनने बांगलादेशला दोन पाणबुड्या दिल्या आहेत. त्या व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा नसल्याचे पर्रीकर यांनी एका प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले आहे. वास्तविक २०१३ मध्येच हसीना यांनी नौदलाचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे, असे जाहीर केले होते.
नेमका भर कशावर राहणार?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सुरक्षा तसेच संरक्षण सहकार्य आणखी दृढ करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. त्यासंबंधी सहमती व्यक्त झाल्यानंतर हसीना यांच्या भारत भेटीत शिक्कामोर्तब होईल.
अनेक संकटांचा मुकाबला
बदलत्या काळातील समस्यांचे स्वरूपही बदलू लागले आहे. अशा समस्यांचा मुकाबला करणे केवळ एखाद्या देशाच्या आवाक्यातील गोष्ट राहिलेली नाही. त्यासाठी शेजारी तसेच मित्र देशांची मदत घेणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे भारत-बांगलादेश यांनी एकत्र येऊन दहशतवाद, तस्करीसारख्या समस्यांचा सागरी प्रदेशात मुकाबला करण्याची गरज नौदलाच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.
१७ रोजी हसीना भारत भेटीवर येणार
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना पुढील महिन्यात भारत भेटीवर येणार आहेत. त्यात संरक्षणविषयक अनेक करारांवर दोन्ही बाजूंनी स्वाक्षऱ्या होऊ शकतात.
बातम्या आणखी आहेत...