आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅक्रोन फ्रान्सचे राष्ट्रपती बनणे निश्चित, वर्षभरापूर्वी स्थापन केला स्वत:चा पक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- फ्रान्स राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी साेशालिस्ट पक्षाचा मानहानीजनक पराभव झाला आहे. त्यांना ६.४% मते पडली. इमानुएल मॅक्रोन यांना सर्वाधिक २३.९, तर दक्षिणपंथीय नेत्या ली पेन यांना २१.४% मते मिळाली. फ्रान्समध्ये राष्ट्रपती निवडणूक जिंकण्यासाठी ५०% पेक्षा अधिक मतांची गरज असते. यासाठी येत्या ७ मे रोजी मॅक्रोन आणि ली पेन यांच्यात लढत होईल. निवडणुकीच्या पहिल्या फेरीत ११ उमेदवार मैदानात होते. त्यासाठी  ७९% मतदान झाले. देशातील प्रमुख पक्षाला दुसरी फेरीही न गाठता येण्याची ही फ्रान्सच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.  

मॅक्रोन हे विद्यमान ओलांद सरकारमध्ये अर्थमंत्री होते. सरकारच्या धोरणाने नाराज होऊन त्यांनी २०१६ मध्ये मंत्रिपदाचा तसेच सोशालिस्ट पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी “आं मार्श’ (पुढे चला) अभियान सुरू केले आणि त्याच नावाने पक्षाचीही स्थापना केली. आता सार्वत्रिक निवडणुकीत ते सर्वात मोठ्या पक्षाचे नेते ठरले आहेत. पहिल्या टप्प्यात पराभूत झालेले साेशालिस्ट उमेदवार बेनोआं आमोन आणि रूढीवादी फियोन यांनी मॅक्रोन यांना पाठिंबा दिला आहे.

ली पेन माघारल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील पक्षांचा मॅक्रोन यांना पाठिंबा  
-पार्श्वभूमी  
इन्व्हेस्टमेंट बँकर आणि उद्योगमंत्री होते मॅक्रोन  
मॅक्रोन हे इनव्हेस्टमेंट बँकर तर होतेच, त्यांनी ओलांद सरकारमध्ये अर्थमंत्रिपदही सांभाळले आहे. तत्त्वज्ञानाचे पदवीधर मॅक्रोन यांचे वडील न्यूरोसायन्सचे प्राध्यापक आणि आई डॉक्टर आहेत.  
आश्वासन : कॉर्पोरेट करात ४० अब्जांची कपात करणार  
बेरोजगारी दर ९.७ वरून ७ टक्क्यांवर आणणार. शाळांमध्ये मोबाइल वापरावर बंदी घालणार.
 
-पार्श्वभूमी  
वडिलांना डावलून पक्षप्रमुख बनल्या ली 
ली पेन यांच्या नॅशनल फ्रंट पक्षाला ६९ लाख मते पडली आहेत. ही त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. ली पेन यांनी जानेवारी २०११ मध्ये वडिलांना हटवून पक्षाची धुरा आपल्या ताब्यात घेतली होती.  
आश्वासन :  मशिदींवर बंदी; ३५ तास कामांचा नियम
ईयूमध्ये फ्रान्सला कायम ठेवण्यासाठी जनमत चाचणी. सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणार.  

मॅक्रोन यांनी १७ व्या वर्षी  ४२ वर्षांच्या विवाहित शिक्षिकेला केले प्रपोज, पत्नीला ७ नातवंडे : ३९ वर्षीय मॅक्रोन यांनी त्यांच्या फ्रेंच भाषेच्या शिक्षिकेशीच लग्न केले आहे. वयाच्या १७ व्या वर्षी ब्रिजिट यांच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. तेव्हा २५ वर्षांनी मोठ्या ब्रिजिट यांनी लग्नास होकार दिला होता. आता त्या ६४ वर्षांच्या असून ७ नातवंडांच्या आजी आहेत.   

ली पेन यांचा दोनदा घटस्फोट, ८ वर्षांची असताना विरोधकांनी घर बॉम्बने उडवून दिले होते : ली पेन या ८ वर्षांच्या असताना त्यांचे वडिलोपार्जित निवास बॉम्बने उडवून देण्यात आले होते. यात कुटुंबीयांना दुखापत झाली. घरही नष्ट झाले. डाव्या पक्षांनी हा हल्ला घडवून आणला, असे काही लोकांचे मत आहे. ली पेन यांचे दोनदा लग्न झाले आणि दोन्ही वेळा घटस्फोट झाला. त्यांना ३ मुले आहेत.
  
निकालांचा परिणाम भारतावर  
मॅक्रोन आणि ली पेन यांनी भारताबाबत कोणतीच भूमिका मांडलेली नाही. भारत फ्रान्सकडून  शस्त्रास्त्रे खरेदी करतो. भारताने ३६ राफेल विमानांसाठी फ्रान्सशी ५९ हजार कोटींचा सौदा केला आहे. नवे राष्ट्रपती भारताशी कसे संबंध ठेवू इच्छितात हे अद्याप स्पष्ट नाही.   
युरोपियन संघावर ली पेन राष्ट्रपती बनल्यास होईल जनमत चाचणी  : मॅक्रोन युरोपियन युनियनशी चांगले संबंध ठेवू इच्छित आहेत. ते राष्ट्रपती बनल्यास फ्रान्स-ईयूचे संबंध पूर्वीप्रमाणे चांगले होतील. मात्र, ली पेन यांच्या मते, फ्रान्सने ईयूतून बाहेर पडावे. राष्ट्रपती बनल्यास ईयूतून बाहेर पडण्यासाठी ब्रिटनच्या धर्तीवर जनमत चाचणी करणार, असे त्यांचे मत आहे.
 
बातम्या आणखी आहेत...