आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delay Of Work Save Cruel Bagdadi, Terrorist Empire In Syria, Iraq

लालफितीच्या कारभारामुळे तेव्हा इस्लामिक स्टेटचा म्होरक्या क्रूर बगदादी निसटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - जगभरात आपल्या क्रौर्याने दहशत निर्माण करणा-या इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबु बकर अल बगदादी याचा खात्मा करण्यासाठी आज अमेरिकेसह अनेक देश टपले असले तरी २०१४ मध्ये त्याने स्वत:ला ‘खलिफा’ जाहीर करण्यापूर्वीच तो इराकी गुप्तहेर पथकाच्या टप्प्यात आला होता, अशी खळबळजनक माहिती समोर येत आहे. मात्र, नोकरशाहीमध्ये बगदादीवरून निर्माण झालेल्या वादात तो निसटल्याचे स्पष्ट होत आहे. बगदादीला जिवंत पकडायचे की ठार मारायचे, यावर एकवाक्यता होऊ शकली नाही त्यामुळे बगदादीला जीवदान मिळाले.

‘द संडे टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या नोव्हेंबरमध्ये इराकी गुप्तचर संस्थेचे काही सदस्य बगदादस्थित आपल्या मुख्यालयात एकत्र आले होते. बगदादीचा खात्मा करण्याची आपली मोहीम फत्ते झाली तर जगात या कट्टरवाद्याने पुकारलेले भयंकर युद्ध एक तर संपेल किंवा त्याची दिशा बदलेल, याची या गुप्तचरांनाही खात्री होती. मात्र, लालफितीच्या कारभारामुळे व सुसंवादाच्या अभावामुळे आज जगातील हा मोस्ट वाँटेड दहशतवादी इराकी पथकाच्या हाती लागू शकला नाही.

पुढे वाचा ... आणि बगदादी निसटला