आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वाधिक तणावाच्या टॉप-20 शहरांत चार भारताची, दिल्ली नवव्या व्या स्थानावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- जगातील सर्वाधिक आणि सर्वात कमी तणाव कोणत्या शहरात आहेत, याबाबत झालेल्या एका अध्ययनात रोचक बाबी समोर आल्या आहेत. टाॅप-२० तणावग्रस्त शहरांत भारतातील चार शहरे आहेत. टॉप-१० मध्ये दिल्ली ९व्या स्थानी आहे. मुंबई १३, कोलकाता १९ आणि बंगळुरू २० व्या स्थानी आहे. पहिल्या क्रमांकावर इराकची राजधानी बगदाद, दुसऱ्या स्थानी काबुल आहे. ढाका ७ व कराची ८ व्या स्थानी आहे. दुसरीकडे, सर्वात कमी तणाव असलेल्या शहरांत जर्मनीचे स्टटगार्ट शहर प्रथम स्थानी असून लॅक्झेंबर्ग सिटी दुसऱ्या व हनोव्हर तिसऱ्या स्थानी आहे. 

जिपजेट या ब्रिटनच्या ड्राय क्लिनिंग व लाँड्री सर्व्हिस कंपनीने जगातील १५० शहरांत हे अध्ययन केले. या शहरांतील ५०० पेक्षा जास्त जागांहून १७ श्रेणींतील आकडेवारी जमा करण्यात आली. मानसिक शांतता, बँक बॅलन्स व नोकरीच्या सुरक्षिततेबाबत जर्मनी सर्वाेत्तम ठिकाण आहे. टॉप-१० कमी तणावाच्या शहरांत जर्मनीची चार शहरे आहेत. यूरोप बाहेरील केवळ सिडने याच शहराचा समावेश आहे. 

स्टुटगार्टमधील नागरिक सर्वाधिक चिंतामुक्त आहेत. हे शहर पोर्शे, बॉश व मर्सिडिझ बेंझसारख्या कंपन्यांचे घर आहे. येथे सर्वाधिक हरित पट्टे आहेत. स्थानिकांनुसार हिरवळीमुळे तणाव कमी होण्यास मदत मिळते. आर्थिक व वैयक्तिक सुरक्षाही सर्वाेत्तम आहे. दुसरीकडे, सिंगापूर व तैपेईत राहणारे लोक सर्वाधिक संतुष्ट अाहेत. सर्वाधिक सुरक्षित ठिकाणांत अबूधाबी, व जपानचे ओसाका शहर पहिल्या-दुसऱ्या स्थानी आहे. 
बातम्या आणखी आहेत...