आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमुद्रीकरणामुळे ब्रिटनमधील भारतीय अडचणीत, वाझ यांचे मोदींना पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन : ब्रिटनमधील भारतीय वंशाचे खासदार केथ वाझ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून विमुद्रीकरणामुळे अनिवासी भारतीयांना होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. ५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्याने येथील भारतीय समुदायाला मोठे नुकसान होत असल्याचे वाझ यांनी मोदींना कळवले आहे. भारत सरकारने नोटाबंदी केल्याने अनिवासी भारतीय आणि ब्रिटिश इंडियन समुदायाला नोटा घेऊन भारतात यावे लागेल. ३० डिसेंबरपूर्वी त्यांना नोटा बदलून घ्याव्या लागतील. ही प्रक्रिया त्रासदायक असल्याचे केथ वाझ यांनी म्हटले आहे.
निर्णय स्वागतार्ह, मात्र : भारत सरकारने चलनी नोटा बंद करून नव्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेतला. हा धाडसी निर्णय असून स्वागतार्ह आहे. मात्र, डिसेंबरअखेरपर्यंत अनिवासी भारतीयांना चलन बदलण्यासाठी भारतात परतणे शक्य नाही. हा निर्णय भारत सरकारने का घेतला असावा, हे मी समजू शकतो, असे वाझ म्हणाले. डिसेंबरअखेरपर्यंत येता न आल्यास त्यांच्या चिंता वाढतील, असे वाझ यांनी पत्रात लिहिले आहे.
तीन कलमी योजनेविषयी विनंती
अनिवासी भारतीयांच्या सुविधेसाठी केथ वाझ यांनी तीन कलमी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुचवली आहे. वर्ष २०१७ च्या उन्हाळी सुट्यांपर्यंत अनिवासी भारतीयांसाठीची डेडलाइन वाढवावी. ब्रिटनमधील भारतीयांना यामुळे दिलासा मिळेल. ब्रिटनमधील बँकांमध्ये चलन बदलून मिळाल्यास अधिकाधिक भारतीयांना या सेवेचा लाभ घेता येईल. या चलन बदलासाठी विशेष भारतीय राजदूताची नियुक्ती करण्यात यावी, अशा तीन कलमी योजनेचा उल्लेख वाझ यांच्या पत्रात आहे.
बातम्या आणखी आहेत...