आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेनिस कोट्स चालवते जगातील सर्वात माेठी बेटिंग वेबसाइट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेनिस यांचे वडील पीटर कोट्स यांनी प्रांतीय ‘बेटिंग चेन’ सुरू केली हाेती. त्यांचे अनेक शाॅप्स हाेते. डेनिसचा भाऊ जाॅन याने प्रथमच वडिलांबराेबर काम करणे सुरू केले. त्या वेळी डेनिस शाळेत जात हाेती. डेनिसने अकाउंटंसीचा अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर वडिलांच्या काही दुकानांवर काम सुरू केले. त्या वेळी त्यांचा व्यवसाय संकटात हाेता. डेनिस यांनी व्यवसायाचे व्यवस्थापन करण्याचे तंत्र अवगत केले अाणि हळूहळू पूर्ण व्यवसायावर पकड निर्माण केली. त्या वेळी बेटिंगचा ऑनलाइन व्यवसाय काही कंपन्यांनी सुरू केला हाेता. डेनिस यांनी अापल्या दुकानाच्या माेबदल्यात १५ दशलक्ष पाऊंडचे कर्ज घेतले अाणि बेट ३६५ डाेमन घेऊन २००१मध्ये वेबसाइट लाँच केली. २००५पर्यंत वेबसाइटचा जम चांगल्या पद्धतीने बसल्यामुळे त्यांनी ४० दशलक्ष पाऊंडमध्ये वडिलांचे दुकान चेन काेरल यांना विकून टाकले अाणि त्या पैशांनी कर्ज फेडले. अाॅनलाइन बेटिंगसंदर्भात वातावरण चांगले निर्माण झाल्यामुळे कंपनीने अापले मुख्यायल जिब्राल्टर येथे बनवले. अाज २००पेक्षा जास्त देश त्यांच्या बेट ३६५ या वेबसाइटच्या माध्यमातून बेटिंग करतात.
डेनिस खूप कमी मुलाखत देतात. मुलाखत दिली तरी त्या ई-मेलच्या माध्यमातून देण्याचा त्यांचा अाग्रह असताे. एकदा त्यांनी फेस-टू-फेस इंटरव्ह्यू दिला ताे यासाठी की, बेट ३६५ ही वेबसाइट त्यांचे वडील पीटर कोट्स चालवत हाेते, असा समज पसरला हाेता. ताे दूर करण्यासाठी फेस-टू-फेस मुलाखत दिली. एका मुलाखतीत डेनिस यांनी सांगितले हाेते की, सुरुवातीच्या काळात कंपनीच्या प्रगतीसाठी रात्र-दिवस मेहनत करत हाेते.
डेनिस यांनी बेटिंग वेबसाइट्समध्ये खूप बदल केला. सर्वात महत्त्वाची गाेष्टी म्हणजे त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यास प्रथम प्राधान्य दिले. त्यांनी अापल्या वेबसाइटवर सांगितले की, कंपनी यूकेच्या बाहेरहून काम करते. परंतु, लाेकांना त्यांच्या दुकानावरसुद्धा जाता येईल. त्या काळात असे जाहीर करणे खूप महत्त्वाचे हाेते. कारण अनेक वेबसाइटचे काम अज्ञातस्थळावरून चालत हाेते अाणि वेबसाइट चालवणाऱ्या व्यक्तीसंदर्भात लाेकांना काहीच माहिती नसायची. यामुळे लाेकांचा अाॅनलाइनवर विश्वास बसत नव्हता. डेनिस यांच्या वेबसाइटवर डाव लावण्याचे अनेक खेळ व पर्याय उपलब्ध अाहेत. परंतु, यूकेच्या बहुतांशी वेबसाइटवर माेठ्या खेळांवरच बेटिंग हाेते. जास्तीत जास्त लाेक वेबसाइटच्या संपर्कात यावे अाणि त्यांचे मनाेरंजन व्हावे, हा डेनिस यांचा उद्देश हाेता. डेनिस यांनी वेबसाइटच्या गेम्समध्ये पोकर, कॅसिनो गेम्स, बिंगो, हॉर्स रेसिंग व स्कील गेम्स टाकले. यामुळे ही एक परिपूर्ण बेटिंग वेबसाइट झाली. यात सातत्याने इनाेव्हेशन हाेत राहिल्यामुळे वेबसाइट चांगली यशस्वी ठरली. स्थानिक टीव्ही प्राेड्युसरसाेबत डेनिस यांनी लाइव्ह हाॅर्स रेसिंगची सुविधा इंटरनेटवर सुरू केली. माेबाइल बेटिंग सुरू केले अाणि डिपाॅझिटचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले. ग्राहकांच्या ई-मेलचे उत्तर कंपनी देते. एका मुलाखतीत त्यांनी म्हटले हाेते. माझा पूर्ण फाेकस काम पूर्ण करण्यावर असताे.
डेनिस कोट्स बेट ३६५ च्या सीईओ
फोर्ब्जनुसार डेनिस जगातील चाैथी सर्वात श्रीमंत महिला अाहे. त्यांची संपत्ती ३.८ अब्ज डॉलर अाहे. सन २०००मध्ये २५ हजार डाॅलरमध्ये त्यांनी बेट ३६५ डॉटकॉम डोमेन विकत घेतले हाेते. त्यांच्या कंपनीजवळ स्टोक सिटी फुटबॉल क्लबचे सर्वात जास्त शेअर अाहे.
बातम्या आणखी आहेत...