आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांतीसेना तैनातीत आता भारताचाही सहभाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्रे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रसंघात मंजुरी मिळाली असून संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने एखाद्या देशात पाठवल्या जाणाऱ्या शांतता सैन्याची तैनाती किंवा या त्याच्या आधुनिकीकरणाची उपाययोजना या सर्व प्रक्रियेत आता भारताचा सहभाग असेल. या देशांमध्ये भारत, चीन णि अमेरिकेचाही समावेश आहे.

संयुक्त राष्ट्राच्या उच्चस्तरीय शांतता शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत सर्वाधिक शांतता सैनिक पाठवणारा देश आहे. मात्र, त्याला तैनाती प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही. संयुक्त राष्ट्राची शांतता मोहीम सैनिकांकडे असणाऱ्या शस्त्रांवर नव्हे तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नैतिक बळावर अवलंबून असेल.

परिषदेस संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अनेक नेते होते. ओबामा म्हणाले, शांतता सैन्यासाठी जशी प्रशिक्षित फौज आवश्यक असते तशी ती मिळत नाही. त्यांनी यासाठी अमेरिकेचे दुप्पट योगदान देण्याची घोषणा केली.