आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोल डान्समुळे वाचले कॅन्सर पीडितेचे आयुष्य, 30 किलो कमी केले वजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनमधील एका महिलेचे आयुष्य गँगरीनमुळे नष्ट होणार होते, परंतु पोल डान्सने तिला वाचवले. वेस्ट ससेक्स येथील वर्दिंग भागामध्ये राहणारी कॅरी दर्हम 31 वर्षांची आहे. वयाच्या 20 व्या वर्षी रिलेशन संपुष्टात आल्यानंतर अत्याधिक खाण्याने आणि गँगरीनमुळे तिचे वजन 63 किलोवरून 89 किलोवर गेले. डॉक्टरांनी तिला सर्व्हिकल कॅन्सर सांगितला. एक वळ अशी आली की तिने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आज ती एक यशस्वी महिला असून स्वतःचे पोल डान्सिंग आणि फिटनेस सेंटर चालवते.

आरशामध्ये स्वतःला पाहण्याची वाटत होती लाज -
कॅरीने सांगितले की, तिला स्वतःला आरशात पाहण्याची लाज वाटत होती. त्यानंतर तिने पोल डान्स सुरु केला आणि 31 किलो वजन कमी केले. पोल डान्सने तिचे आयुष्य बदलले. पाच फुट सहा इंच कॅरीला डॉक्टर ओव्हरवेट म्हणाले होते. त्यानंतर तिने टीव्हीवर पोल डान्स पाहिला, जो फिटनेससाठी चांगला मानला जातो. तिने पोल डान्स करण्याचा निश्चय केला. यापूर्वी ती डॉक्टरकडे जात होती, तेव्हा तिला अँटी डिप्रेशनच्या गोळ्या दिल्या जात होत्या. तिला हे आजीबात आवडत नव्हते.

कॅन्सरवर मिळवला विजय -
कॅरी वयाच्या 21 व्या वर्षापासूनच सर्व्हिकल कॅन्सरने पिडीत होती. तिने सांगितले की, कॅन्सर विषयी समजल्यानंतर ती खचून गेले होती. परंतु तिने कॅन्सरशी लढण्याचा निश्चय केला. 89 किलोवरून 57 किलोपर्यंत वजन कमी केले. आज ती इतर महिलांना फिटनेस ट्रेनिंग देते.

पुढील स्लाईड्सवर पाहा, कॅरीचे पोल डान्सिंगचे आणि इतर फोटो...
बातम्या आणखी आहेत...