आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाराेग्य: नैराश्यामुळे मेंदू आकुंचित होण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - नैराश्यग्रस्त व्यक्तीच्या मेंदूचा हिपोकॅम्पस भाग लहान हाेत असल्याचा निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या अभ्यासात काढण्यात आला आहे. हिपोकॅम्पस स्मरणशक्ती आणि विविध भावानांशी संबंधित असतो. संशोधकांच्या मते, किशोरवयीन मुलांमधील नैराश्यावर तत्काळ इलाज होणे आवश्यक आहे.

नैराश्यावर उपचार झाल्यास हिपोकॅम्पस पूर्ववत स्थितीत येऊ शकतो, असा दावा अभ्यासकांनी केला आहे. संशोधन पथकाचे सदस्य आणि सिडनी विद्यापीठाच्या ब्रेन अँड माइंड रिसर्च इन्स्टिट्यूटचे हिकी म्हणाले, व्यक्ती सतत नैराश्यात राहत असेल तर त्याच्या मेंदूचा हिपोकॅम्पस भाग आकुंचित पावतो. नैराश्यातील व्यक्तीचा इलाज न झाल्यास हिपोकॅम्पस भागाचे जास्त नुकसान होते. केवळ औषधातून नैराश्यावर इलाज होऊ शकत नाही. त्यासाठी सामाजिक मदतही आवश्यक ठरते. किशोरवयीन मुलांच्या नैराश्यात वैद्यकीय मदत घेतल्यास त्याचा ब-यापैकी उपयोग होतो.

६५ टक्के रुग्ण
जगभरातील १५ संशोधन संस्थांनी हे संशोधन केले आहे. यामध्ये ८,९२७ नागरिक सहभागी झाले होते. त्यातील १,७२८ लोकांना नैराश्याचा गंभीर आजार होता. उर्वरित लोक निरोगी होते. संशोधकांच्या अभ्यासात सतत नैराश्यात राहणा-या ६५ टक्के व्यक्तींचे िहपोकॅम्पस इतरांच्या तुलनेत लहान होते.

पुढे वाचा, निसर्गात फिरल्यामुळे नैराश्य दूर होते