आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरियाचे उपपंतप्रधान तोफेच्या तोंडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सियोल - आपल्या मताशी सहमती न दाखवल्याने उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांनी उपपंतप्रधान चो योंग गोन यांना तोफेच्या तोंडावर ठेवून उडवून दिल्याचे वृत्त आहे.
दक्षिण कोरियाच्या "योनहाप' या वृत्तसंस्थेने बुधवारी ही माहिती जाहीर केली आहे. उत्तर कोरियातील वन्य तसेच हरित धोरणाबाबत चो गोन यांनी स्वतंत्र मत मांडले होते. हे मत जोंग यांना न पटल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. उत्तर कोरियासोबतच्या संबंधावर लक्ष ठेवणाऱ्या दक्षिण कोरियाच्या एकीकृत मंत्रालयाने माध्यमांना सांगितले की, चो गोन हे मागील आठ महिन्यांपासून बेपत्ता आहेत.

२००० च्या दशकात सुरू करण्यात आलेल्या कन्स्ट्रक्शन अँड बिल्डिंग मटेरियल इंडस्ट्री मंत्रालयाचे ते उपमंत्री होते. दरम्यान, दक्षिण कोरियासोबत झालेल्या व्यापार वार्तेतही त्यांचा सहभाग होता.