आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: इस्लामला होता विरोध, धर्म सोडला तर कुटुंबाने घराबाहेर काढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ब्रिटनमध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे, पण धर्म आणि कुटुंबाला सोडण्याचा अर्थ आयुष्यात एकटेपणा आणणे असा आहे. सध्या या दुःखातून एक्स मुस्लिम सारा वायोगा जात आहे. धर्म सोडण्याचा निर्णय का घेतला आणि कसे कुटुंबीयांना सांगितले याची माहिती साराने बीबीसी न्युजबीट वाहिनीसोबत बोलताना दिली आहे.
सारा सांगते, की माझा या धर्मावर विश्वास नव्हता. पण मी इतरांना खोटे सांगत होते. त्यांना धोका देत होते. त्यामुळे मी सर्वांना खरे सांगण्याचा निर्णय घेतला. परिणामी मला माझा धर्म सोडावा लागला. 17 वर्षांची असताना मला घर सोडावे लागले.
सारा धर्मापासून गेली दूर
सारा सांगते, की मी मोठी झाली तेव्हा मला जाणवले, की माझे विचार इस्लामशी अनुकूल नाहीत. परंतु, तरीही हे मी कुणाला सांगितले नाही. कुटुंबीयांच्या दबावामुळे अरबी शिकली आणि नमाज वाचत होती. माझे कुटुंबीय नेहमीच मला चेक करायचे. एक दिवस मी जिन्यावरुन खाली येत होती, तेव्हा माझ्या आईवडीलांनी विचारले की तू नमाज अदा केला का... मी नवाज अदा केला नसतानाही हो म्हटले. यावर ते म्हणाले, तुला माहित आहे ना, की नमाज अदा करताना बुटे काढायची असतात. मुस्लिम समाजात नमाज अदा करण्यापूर्वी बुटे काढायची असतात. पाय धुवायचे असतात. तेव्हा मला खुप वाईट वाटले. आता या गोष्टी लपविणे मला कठिण जात होते. त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पण हे एवढे सोपे नव्हते.
कुटुंबाला खरे सांगितले
जेव्हा मी ही खरी गोष्ट आईवडीलांना सांगितली, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून पाणी आले. यावेळी मला त्यांना मिठी मारायची होती. पण त्यांच्या दुःखाचे कारणही मिच होती. ड्रींक आणि डुकराचे मटण खाण्यासाठी मी इस्लाम सोडत असल्याचा ग्रह त्यांनी करुन घेतला. पण असे काहीही नव्हते.
साराने सांगितले, की माझ्या या चुकीने मी जहन्नुममध्ये जाऊ नये, असे त्यांना वाटत होते. पण त्यांच्या या भीतीने माझा निर्णय बदलणार नव्हता. विद्यापिठात दाखल झाल्यानंतर मी एका ग्रुपमध्ये दाखल झाली. यात एक्स मुस्लिमांसोबत चर्चा करुन त्यांची मदत केली जात असे. तेव्हा माझे ऐकटेपण जरा दूर झाले.
पुढील स्लाईडवर बघा, एक्स मुस्लिम साराचे काही फोटो....