नुकतेच सीरियात राष्ट्रपती बशर अल असदच्या सैन्याने एका शाळेवर बॉम्ब हल्ला केला होता. त्यात 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. आता तिच्या अंत्यसंस्काराची छायाचित्रे समोर आली आहेत. वडील आपल्या मुलीचे प्रेत हातात घेतल्याचे दिसते.
राजधानी जवळ सेना आणि बंडखोर यांच्या दरम्यान संघर्ष...
- 5-6 जानेवारी रोजी राजधानी दमास्कस आणि त्यास लागून असलेल्या डूमाच्या भागात झालेल्या गोळीबारात 26 लोकांचा मृत्यू झाला होता.
- एका निरीक्षक गटानुसार, असद सैन्याने डूमाच्या पूर्वेकडील घौटा भागात हवाई हल्ले केले. यात सहा लोक मारली गेली होती.
- या दरम्यान सैन्याने एका किंडरगार्टरवरही बॉम्ब हल्ले केले होते. यात मुलीसह 10 लोक मारली गेली.
- सैन्याच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दाखल पूर्व घौटातील बंडखोरांनीही दमास्कसमधील रहिवाशी भागावर मोर्टार डागली. यात 9 लोक मारली गेली होती.
सध्या सीरियात काय चालू आहे?
-सीरियात गेल्या पाच वर्षांपासून नागरी युध्द चालू आहे. हा देश अशांत आणि युध्दभूमीत बदलला आहे.येथे अनेक गट तयार झाली आहे.
- एकीकडे सरकार आणि बंडखोरांमध्ये संघर्ष चालू आहे. दुसरीकडे इस्लामिक स्टेटही सीरियाच्या ब-याच मोठ्या भूभागावर नियंत्रण मिळवून हिंसक कारवाया करत आहे.
- हिंसेत आतापर्यंत 2 लाख 60 हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित छायाचित्रे