आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा बांगलादेशच्या रस्त्यांवर वाहले रक्ताचे पाट, बघा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक सोसायट्यांच्या समोर असे दृष्य दिसून येत होते. - Divya Marathi
अनेक सोसायट्यांच्या समोर असे दृष्य दिसून येत होते.
ढाका (बांगलादेश)- बकरी ईद निमित्त बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर जनावरांची कुर्बानी देण्यात आली. अगदी रस्त्यांवर ठिकठिकाणी कुर्बानीचे बकरे दिसून येत होते. या दरम्यान ढाक्यात मुसळधार पाऊसही झाला. या पावसाच्या पाण्यात बकऱ्यांचे रक्त मिसळले गेले. त्यामुळे ठिकठिकाणी असे रक्त मिश्रित लाल पाणी वाहताना दिसून येत होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
वाचा काय म्हणाले बांगलादेशी
- मुसळधार पावसामुळे ढाक्यात ठिकठिकाणी पाणी जमते. याची माहिती महापालिकेला देण्यात आली होती. पण अजूनही पालिकेने याकडे लक्ष दिलेले नाही.
- बकऱ्यांच्या कुर्बानीसाठी महापालिकेने काही जागा निश्चित केल्या होत्या. पण तेथे कुणी गेलेच नाही. घराच्या आवारातच बकऱ्यांची कुर्बानी दिली.
- मुसळधार पाऊस असल्याने नागरिक कुर्बानीच्या जागी गेले नाहीत. त्यांनी घराच्या आवारातच कुर्बानी दिली. त्यामुळे बकऱ्यांचे रक्त पाण्यात मिसळले गेले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, ढाक्याच्या रस्त्यांवर कसे वाहले रक्ताचे पाट.... असे होते भयावह दृष्य....
बातम्या आणखी आहेत...