आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या आईसाठी लाखोंची ‘जामदानी’ साडी गिफ्ट करणार बांगलादेशच्या PM

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामदानी साडीचा फोटो. - Divya Marathi
जामदानी साडीचा फोटो.
ढाका - बांगलादेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रमाधन मोदींच्या आईसाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना एक मौल्यवान साडी भेट म्हणून देणार आहेत. बांगलादेशच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बांगलादेश दौऱ्यावर जाणाऱ्या काही खास परदेशी नेत्यांच्या कुटुंबातील महिलांसाठी ही साडी भेट म्हणून दिली जाते. या अधिकाऱ्याच्या मते शेख हसिना मोदींच्या आईला भेट म्हणून देतील. या साडीची किंमत लाखोंमध्ये असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.

हाताने तयार केली जाते साडी
जामदानी साडी ही हाताने तयार केली जाते आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणवर परिश्रम तसेच वेळही खर्ची जातो. साडी तयार करताना एक खास प्रकारची नक्षी कोरली जाते. साधारणपणे ती भुरक्या रंगाची असते. जामदानी साठीला भारत आणि बांगलादेशात एक खास दर्जा आहे. अगदी अंगठीतून आरपार जाईल एवढी पातळ ही साडी असते. आधी केवळ पुरुष या साड्या तयार करायचे. पण आता बांगलादेशात महिलाही या व्यवसायात आहेत. बऱ्याचदा ही एक साडी तयार करण्यासाठी दोन दोन वर्षांचा कालावधीही लागत असतो. ढाक्याच्या जामदानी साड्या चांगल्याच महागड्य़ा असतात. आणि बहुतांश वेळा सेलिब्रिटींनी परिधान केलेल्या असतात. गेल्या वर्षी लॅक्मे फॅशन वीकमध्ये विद्या बालनने अशी साडी परिधान केली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जामदानी साडीचे PHOTO
बातम्या आणखी आहेत...