आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकंपामुळे प्रथमच चालली "देवी', धन कुमारी म्हणाली, हे दिवस पाहावे लागतील असे वाटले नव्हते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूकंपाअाधी देवी लोकांसमोर आली नव्हती. - Divya Marathi
भूकंपाअाधी देवी लोकांसमोर आली नव्हती.
काठमांडू- एप्रिल २०१५ मध्ये नेपाळमध्ये भूकंप आल्यानंतर येथील "कुमारी' म्हणजे "जिवंत देवी'ला जे करावे लागले त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. त्यांना पहिल्यांदाच नेपाळमधील गल्लीतून बाहेर पडावे लागले. ६३ वर्षीय देवीने एका मुलाखतीत ही बाब सांगितली.
दोन वर्षांपासून एकट्याने जीवन व्यतीत करणाऱ्या धन कुमारी वज्राचार्य यांनी गादीवर बसल्याच्या ३० वर्षांच्या कार्यकाळाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, १९८० च्या दशकात त्यांना गादीवरून हटवण्याच्या कृतीच्या टोचण्या आजही लक्षात आहेत. २५ एप्रिल २०१५ रोजी आलेल्या ७.८ तीव्रतेच्या भूकंपाआधी त्यांचे सजवलेल्या पालखीतून एकदाच दर्शन झाले होते. नेपाळमध्ये "जिवंत देवी'ला "कुमारी' नावाने ओळखले जाते. हिंदू आणि बौद्ध धर्माशी संबंधित परंपरांशी बांधील जिवंत देवीला एकाकी आयुष्य घालवावे लागते आणि त्या लोकांशी क्वचितच बोलतात.

भूकंपानंतर वज्राचार्य यांना दक्षिण काठमांडूच्या ऐतिहासिक पाटन शहरातील आपल्या घरातून बाहेर पडावे लागले होते. गेल्या तीन दशकांत अशी पहिल्यांदा वेळ आली. त्या म्हणाल्या, मला अशा पद्धतीने घर सोडावे लागेल,असा विचारही केला नव्हता. हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यातून त्या अद्याप सावरल्या नाहीत. ६३ वर्षीय वज्राचार्य म्हणाल्या, लोक आता परंपरांचा आदर करत नाहीत, त्यामुळे कदाचित ईश्वर नाराज असावेत. भूकंपात देवीचे पाच मजली घरही हादरले होते. मात्र, देवी घरी थांबेल की परंपरा तोडून बाहेर निघेल, याची वाट नातेवाइकांनी पाहिली.

अखेर काय करावे हे समजत नव्हते. आम्ही इतरांप्रमाणे घर सोडून जाऊ शकत नव्हतो, असे त्यांच्या भाचीने सांगितले. निसर्गापुढे काही चालत नाही. त्यामुळे जे काही करावे लागले त्याची कल्पनाही करता येत नाही. धन कुमारी १९५४ मध्ये गादीवर विराजमान झाल्या. साधारण तीन दशके त्या पाटनच्या कुमारी देवी राहिल्या. नेपाळमध्ये कुमारिकेच्या निवडीचे कडक नियम आहेत.
बातम्या आणखी आहेत...