आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाँगकाँगमध्ये ‘हिऱ्यां’चा पाऊस, शेकडो लोकांनी घेतला अनुभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँग- आकाशातून हिऱ्याचा पाऊस पडल्याची बातमी ऐकायला नक्कीच सुखद वाटते; परंतु हाँगकाँगमध्ये शेकडो लोकांनी हा अनुभव घेतला. त्यांनी रस्त्यावर पडलेल्या चमकणाऱ्या क्युबिक जिरकोनिक्स स्टोन्सला हिरे समजून उचलण्यास सुरुवात केली. लोकांनी एकही खडा सोडला नाही. एवढेच नव्हे तर लहान खड्यांना विशिष्ट उपकरणाने उचलले. प्रत्येकजण खडे मुठीत, खिशात घेऊन जात होता. काहींनी तर त्याची ऑनलाइन विक्रीही केली.

हाँगकाँगच्या सिम शा सुईच्या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास एका महिलेने स्टोन्सला पाहून हिऱ्यांचा पाऊस होत असल्याची अफवा पसरवली. हे ऐकून परिसरातील शेकडो लोक तेथे धावले. ते रस्त्यावर बसून जिरकोनिक्स स्टोन गोळा करू लागले. हे खडे हिऱ्यासारखे चकाकणारे स्फटिक असते. त्याचा उपयोग कृत्रिम दागिन्यात होतो. कोणीतरी हे खडे फेकून दिले होते. रस्त्यावरील चमक पाहून लोकांचे डोळे दीपून गेले. त्यांच्या मनातील इच्छा प्रत्यक्षात समोर आल्याने लोक आनंदित होऊन गेले होते. हे खडे गोळा करताना आपसांत झटापट होत असल्याचेही पाहायला मिळाले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, लोकांनी कसे वेचले हिरे..