आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्यूरासिक वर्ल्डचे धोकादायक डायनासोर मनोरंजनही करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टीव्हन स्पिलबर्गचा १९९३ मध्ये आलेला चित्रपट ज्युरासिक पार्कमधील डायनासोर आश्चर्यकारक प्राणी होते. १२ जून रोजी प्रदर्शित होत असलेल्या ज्युरासिक वर्ल्डमध्ये थीम पार्कची सैर करणाऱ्या दर्शकांसाठी सर्व हिंस्र पशू एकसमान होते. चित्रपटाचे दिग्दर्शक कोलिन ट्रेवोरो म्हणाले, आम्ही असे जग स्थापित करू इच्छितो ज्यात आपल्या आसपास कमी होणाऱ्या प्राण्यांची माहिती दिली जावी.
चित्रपटात थीम पार्कच्या व्यवस्थापनाकडून जुन्या डायनासोरला कंटाळलेल्या दर्शकांमध्ये उत्सुकता कायम राहावी यासाठी लुप्त होणाऱ्या प्रजातींच्या अवशेषातून जीएम (जीन संवर्धित) टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सुपर डायनासोरची निर्मिती केली जाते. त्यामुळे त्यानंतर अराजकतेचे चक्र सुरू राहते. चित्रपटाचा नवा सुपर स्टार इंडोमिनस रेक्स आहे. ट्रेवोरो म्हणाले, एखाद्या इंग्रजी कादंबरीवर आधारित चित्रपटातील राक्षस वाटावा, असा हा अनोखा प्राणी नाही. कार्यकारी निर्माते स्पिलबर्ग आणि जीवाश्म शास्त्रज्ञ जॅक हॉर्नर यांनी रेक्सची प्रतिमा खूप स्मार्ट, चपळ आणि महाकाय बनवली आहे. ज्युरासिक पार्कमध्ये डायनासोर एका शास्त्रीय प्रकल्पाचा भाग होता. ज्युरासिक वर्ल्डमध्ये त्यास रोमांचित करणारा दाखवले असून तो मनोरंजनही करतो. ज्युरासिक वर्ल्डच्या डायनासोरला सीजीआय, अॅनेमेट्रॉनिक्स आणि मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून चित्रित करण्यात आले. मात्र, स्पिलबर्गच्या डायनासोरपेक्षा तो अधिक निर्दयी आहे. ट्रेवोरो म्हणाले, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम राहावी यासाठी तसे करणे आवश्यक आहे. याआधी पाहिलेल्या कलाकृतीपेक्षा अद््भुत आणि आणखी चांगले पाहण्याच्या वळणावर आपण आहोत.
पुढील स्लाइडवर वाचा इतर चित्रपटांबाबत...
बातम्या आणखी आहेत...