आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मादुरो सरकारविरुद्ध डिजिटल लढा; प्रमुख संकेतस्थळे हॅक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराकस- व्हेनेझुएलाची १२ पेक्षा अधिक संकेतस्थळे बंडखोरांनी हॅक केली असून बहुतांश संकेतस्थळे प्रशासकीय आणि सरकारी आहेत. या हॅकर्सना सशस्त्र बंडखोरांनी पैसा पुरवला असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. हॅकर्सनी आपली आेळख ‘बायनरी गार्डियन्स’ अशी सांगितली आहे. सरकारी पोर्टल, सर्वोच्च न्यायालयाचे संकेतस्थळही हॅक करण्यात आले आहे. दिग्गज खासगी कंपन्यांच्या संकेतस्थळांना हॅक करण्यात आले असून येथील डायरेक्ट टीव्ही या माध्यम समूहालादेखील बंडखोरांनी लक्ष्य केले आहे.  
 
या हॅकिंगच्या आदल्या दिवशी व्हेनेझुएलातील तीन बडतर्फ लष्करी अधिकाऱ्यांनी व्हॅलेन्सिया येथील लष्करी तळावर धाड टाकली होती. यात एक कॅप्टन आणि दोन लेफ्टनंट पदावरील अधिकारी होते. त्यांच्यासह गणवेशातील २० व्यक्ती होत्या. 

लोकप्रतिनिधींवर दबाव  
व्हेनेझुएलाच्या प्रतिनिधिगृहातील विरोधी पक्षाच्या आणि उदारमतवादी लोकप्रतिनिधींवर मादुरो समर्थक अधिकारी सतत निगराणी ठेवून असतात. त्यांच्या चेंबरमध्येदेखील निकोलस मादुरोंच्या समर्थकांचा भरणा आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी ट्विटरवर आपल्या चेंबरमधील छायाचित्रे पोस्ट केली आहेत. मादुरो यांनी निवडणुकीच्या माध्यमातून ‘कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली’चे गठन केले होते. यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. ही असेंब्ली बेकायदेशीर असल्याचे विरोधकांचे म्हणणे होते. आपल्या चेंबरवर यांनी आक्रमण केले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सरकारच्या प्रत्येक विभागावर हिचे वर्चस्व राहावे अशी व्यवस्था केली आहे. मादुरोंच्या एकाधिकारशाहीचा हा पुरावा असल्याचे विरोधी पक्षाने म्हटले आहे. मादुरोंचे टीकाकार  अॅटर्नी जनरल लुईसा ऑर्टेगा यांनाही बडतर्फ करण्याचे काम असेंब्लीने नुकतेच केले.  

‘द ग्रेट डिक्टेटर’चा उतारा 
बायनरी गार्डियन अशी आेळख सांगणाऱ्या या हॅकर्सनी लष्करी तळावर टाकलेल्या धाडीचे समर्थन केले आहे. याला हॅकर्सनी ‘ऑपरेशन डेव्हिड’ असे संबोधले असून चार्ली चॅप्लिनच्या ‘द ग्रेट डिक्टेटर’ चित्रपटातील एक उताराही हॅक केलेल्या पोर्टलवर टाकला आहे. आमचा लढा डिजिटल आहे. तुम्ही रस्ते अडवता, आम्ही नेटवर्क अडवू, असे ते म्हणाले.

संयुक्त राष्ट्राचीे टीका
संयुक्त राष्ट्राने व्हेनेझुएला सरकारच्या अतिरेकी सैन्यबळ वापरावर टीका केली आहे. यामुळे ४६ आंदोलकांचा बळी गेला असून विरोधाला दमनतंत्राने चेपण्याचे काम व्हेनेझुएलाचे सरकार करत असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले. मानवाधिकार आयोगाने ागरिकांच्या मुलाखती घेतल्या. सैन्य तैनात केल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. 
बातम्या आणखी आहेत...