आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: या देशात 2 महिने दिसत नाही सूर्य, थंडीत असे जगतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - भारतात बहुतांश ठिकाणी हिवाळ्यात 5 अंश सेल्सियस तापमानातच लोकांचे दात वाजायला लागतात. अशात ज्या ठिकाणी उणे 90 अंश सेल्सिअसच्या वातावरणात लोकांचे काय हाल होत असतील याचा विचार न केलेलाच बरा. त्यातही मायनस 90 डिग्रीच्या वातावरणात दिवसच निघत नसेल तर? रशियाच्या वोस्तोक बेटावर थंडीत तब्बल 2 महिने सूर्य दिसतच नाही. गतवर्षी या बेटावर तापमान -89.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. रक्त गोठवणारी थंडी केवळ वोस्तोक बेटावरच नव्हे, तर रशियातील अनेक भागांत असे वातावरण आहे. त्यापैकीच एक डिक्सन येथे लोक थंडीची तयारी वर्षभर करत असतात. 
 
> कारा सागराजवळ असलेला हा बेट जगातील सर्वात सुंदर बेटांपैकी एक आहे. 17 व्या शतकात याला ‘डॉल्गी’ आणि ‘कुजकिन’ अशा नावाने ओळखले जात होते. 
> 1875 मध्ये येथे एक स्वेडिश बिझनसमन ऑस्कर डिक्सन पोहोचले. त्यांना हा बेट इतका आवडला की त्यांनी या बेटाचा कायापालट केला. त्यामुळेच, या बेटाचे नाव त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाले. 
> या बेटावर मोठ्या प्रमाणात खनिज आणि पेट्रो केमिकल्स दडलेले आहेत. दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैनिकांनी या ठिकाणी बॉम्बचा पाऊस पाडला होता. यानंतर पुन्हा या बेटाचे पुनरुत्थान करण्यात आले. 1000 लोकसंख्या असलेल्या या बेटावर विमानतळ देखील आहे. 
> थंडी या बेटावर वर्षभर आहे. मात्र, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये लोकांचे हाल होतात. या दोन महिन्यांत बर्फ आणि धुके एवढे घनदाट होते की सूर्य दिसतच नाही. चोवीस तास स्ट्रीट लाइट चालू ठेवावे लागतात. रस्त्यांवर, घरांवर आणि वाहनांवर कयेक फुट बर्फाचे थर तयार होतात. त्यामुळे बहुसंख्य लोक या महिन्यात घराबाहेरच निघत नाहीत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, 'डीप फ्रीजर'मध्ये जगणे काय असते त्याचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...