आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलच्या अध्यक्षांवर महाभियोगाची शक्यता, कनिष्ठ सभागृहाची मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझिलिया - ब्राझीलच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष डिल्मा रुसेफ यांना संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने चांगलाच धक्का दिला आहे. सभागृहाने रुसेफ यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव दोन तृतीयांशपेक्षा जास्त मतांनी मंजूर करून तो सिनेटकडे पाठवला आहे. कनिष्ठ सभागृहात रविवारी जवळपास पाच तास चाललेल्या चर्चेनंतर मतदान झाले.

प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ५१३ पैकी फक्त ३४२ मतांची गरज होती. प्रस्तावाच्या बाजूने ३६७ मते, तर विरोधात फक्त १३७ मते मिळाली. सात सदस्य गैरहजर राहिले तर दोघांनी मतदानात भाग घेतला नाही. आता सिनेटमध्ये त्यावर चर्चा होईल. सभागृहात रुसेफ यांच्या समर्थकांनी जोरदार गोंधळ घातला. हा प्रस्ताव सिनेटमध्ये मंजूर होणार नाही,असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

राष्ट्राध्यक्षांचे चीफ ऑफ स्टाफ जॅक वॅग्नर म्हणाले की, अध्यक्षांनी कुठलेही चुकीचे काम केले नाही. पण त्याकडे दुर्लक्ष करून संसद सदस्यांनी मतदान केले. कनिष्ठ सभागृहाने ३० वर्षांच्या लोकशाही प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे.

रुसेफ यांचे अॅटर्नी जनरल होसे एदुआर्दो कार्दोजे म्हणाले की, हा प्रकार म्हणजे लोकशाहीच्या विरोधातील बंड आहे. रुसेफ यांनी १९७० च्या दशकात लष्करी शासनाविरोधात लढा देऊन तुरुंगवास पत्करला होता.
पुढील स्‍लाइडवर वाचा, असे आहेत आरोप