आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायनासोरच्या पिलाचा जन्म ३ ते ६ महिन्यांत! अंड्याचे वजन किमान ४ किलो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- डायनासोरच्या अंड्याला उबवण्याचा कालावधी ३ ते ६ महिने असल्याचे एका संशोधनात दिसून आले. ही प्रजाती का लुप्त झाली या दिशेने हे संशोधन सुरू आहे. अंडी उबवण्याचा कालावधी कळल्याने एक मोठा धागा या दिशेने मिळाल्याचे मत संशोधक ग्रेगोरी एरिक्सन यांनी व्यक्त केले.

फ्लोरिडा स्टेट विद्यापीठात यावर संशोधन सुरू आहे. या प्रजातीच्या दातांवरही संशोधन सुरू आहे. डायनासोरच्या अंड्याचे वजन किमान ४ किलो असते. दोन विविध प्रजातींच्या डायनासोरवर हे संशोधन सुरू आहे. दातांच्या वाढीवरून त्यांच्या अस्तित्वाचा व वाढीचा वेध घेतला जातो.  
बातम्या आणखी आहेत...