आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉस्पिटल स्टाफने तोडले बाहुलीचे पाय, भरावा लागला 63.75 लाखांचा दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुसेनची बहीण तिच्या तुटलेल्या बाहुलीसह. - Divya Marathi
सुसेनची बहीण तिच्या तुटलेल्या बाहुलीसह.
वाल्साल (ब्रिटेन) - ब्रिटनमध्ये एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. वाल्साल मेनर हॉस्पिटलला एका महिलेच्या बाहुलीचे हात-पाय तोडल्याने 65 हजार पाऊंड (63.75 लाख रुपये) दंड भरावा लागला आहे. ही बाहुली एक विशेष महिला (डिफरंटली एबल) सुसेन हियर्से हिची होती. ही महिला या बाहुलीला आपली मुलगी समजायची.

हॉस्पिटलने बाहुलीचे हात पाय तोडल्याच्या प्रकारानंतर या महिलेच्या नातेवाईकांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने हॉस्पिटल कर्मचाऱ्यांची चुकी असल्याचे स्पष्ट करत दंड म्हणून ही रक्कम भरण्याचे आदेश दिले. अशा प्रकारच्या अमानवी कृत्यांमुळे सुसेन कधीही बरी होऊ शकणार नाही, असे तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

सुसेनच्या नातेवाईकांना ही बाहुली हॉस्पिटलच्या फ्लोअरवर सापडली होती. या बाहुलीचे हात मुडपण्यात आले होते, कपडे विखुरलेले आणि पाय तोडलेले अशा अवस्थेत ती बाहुली होती. एका नर्सने हा प्रकार केला होता, असे सांगण्यात येत आहे. अशा प्रकारच्या महिलेची अधिक काळजी घेण्याची गरज होती, हे रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आले नाही, असे कोर्टाने म्हटले.
बातम्या आणखी आहेत...