काही महिन्यांपूर्वी लाखो सिरियन आणि इराकींनी युरोपातील वेगवेगळ्या देशांत आश्रय घेतला. मात्र एक वर्षाच्या आतच त्यांना खरे स्वरूप कळू लागले तेव्हा त्यांच्या पदरी निराशाच येत गेली. आता त्यांनी मायदेशी परतणेच योग्य, असे म्हणून घरचा रस्ता धरला आहे.
मी मोहंमद अल जबिरी (२३) या तरुणाची माहिती सांगतो. चांगले जीवन जगण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने युरोपात आश्रय घेतला. नशीब त्याला फिनलंडला घेऊन गेले. तेथे तो एक रात्रही आरामात झोपू शकला नाही. युरोप आणि इराकमधील जीवनाचा फरक तो पाहू लागला. तेव्हाच त्याने ठरवले बस्स, आपण मायदेशी परतायचे. त्याने म्हटले, येथील अनेक न रुचणाऱ्या गोष्टींमुळे मी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. येथे मला लागणाऱ्या रोजच्या काही वस्तू खूप महाग वाटतात. मोहंमद अल जबिरीसारख्याच हजारो लोकांनी या ठिकाणाची अवास्तव स्वप्ने रंगवली होती. गेल्या वर्षी ज्या
युरोपियनांनी आमचे उत्साहात स्वागत केले होते तीच मंडळी पॅरिस हल्ल्यानंतर आमच्याकडे संशयित नजरेने पाहत होती. तथापि, ज्यांच्या परिसरावर इसिसच्या दहशतवाद्यांनी कब्जा मिळवला आहे असे अनेक इराकी अजूनही युरोपात वास्तव्यास आहेत. काही लोकांना अजूनही चांगल्या भवितव्याची अाशा आहे. काही असेही आहेत, ज्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होता यावे म्हणून बगदाद सोडले.
जबिरी याने म्हटले, मी इराक सोडले. कारण माझ्याकडे चांगले काम नव्हते. त्याला शिक्षणही सोडावे लागले होते. फिनलंडमध्ये आल्यानंतर महिने उलटत होते तसा तणाव वाढत होता. काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर इराकींनी काही अशा प्रकारच्या पोस्ट मोठ्या प्रमाणावर केलेल्या होत्या : आम्ही आमच्या देशबांधवांना युरोपात येऊ नका, असे कळवले होते. अलीकडेच एक व्हिडिओ असा आला, ज्यात एका इराकीने युरोपात जेवण मिळत नसल्याची तक्रार केली आहे.
इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने गेल्या वर्षी ३ हजार ५५० इराकींना मायदेशी परतण्यास मदत केली आहे. ऑर्गनायझेशनच्या इराक मिशनचे प्रभारी थॉमस विज यांनी इराकीचे २०१६ च्या सुरुवातीस मायदेशी परतण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असल्याचे म्हटले आहे.
इराक सरकारने प्रतिनिधींचे शिष्टमंडळ पाठवले असून इराकींना सुखरूप परतता यावे यासाठी हे शिष्टमंडळ प्रयत्न करत आहे. इराकी मायग्रेशन विभागाचे प्रवक्ते सत्तार नवरोज यांनी सांगितले की, खासगी कारणामुळे इराकी आपल्या मायदेशी परतत आहेत. युरोपात गेल्याची काही इराकींना मोठी किंमत चुकवावी लागली आहे. हॅथम अब्दुल लतीफ यांना त्यांच्या १० वर्षांच्या मुलींसाेबत युरोपात येण्यासाठी ५० लाखांची लक्झरी कार विकावी लागली. ती कार त्यांनी केवळ साडेपाच लाखांत विकली होती. बेल्जियमला येण्यासाठी त्यांनी काही चांगली स्वप्ने पाहिली होती, परंतु सत्य
परिस्थिती वेगळीच आहे. आत ते म्हणतात, दुसऱ्या देशात मरण्याऐवजी माझ्या देशात मरणे मी पसंत करेन.
© The New York Times