आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9/11 हल्यानंतर सौदीने लाच देऊन लॉबिंग केल्याचे चव्हाट्यावर; हजारो डॉलर्सची दिली लाच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- ९/११ च्या हल्ल्यामध्ये बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना सौदी अरेबियाविरुद्ध अमेरिकन कोर्टात दाद मागता यावी यासाठी प्रतिनिधिगृहात विधेयक संमत करून घेण्यात आले आहे.  या प्रकरणाविषयी अमेरिकन नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी शांत राहावे यासाठी सौदीने लाच खाऊ घातली होती. विरोधकांनी याविरुद्ध व्यापक अभियान सुरू केले आहे.  सौदी अरेबियाच्या सरकारने यासाठी हजारो डॉलर्सची लाच दिल्याचे प्रकरण उजेडात आले आहे.  

दुसऱ्या महायुद्ध काळातदेखील अमेरिकेत परदेशातून पैसा घेणाऱ्यांची लॉबी तयार करण्यात आली होती. परकीय राजकीय पक्षांनीदेखील येथील राजकीय नेत्यांना आणि सैन्यातील बड्या अधिकाऱ्यांना लाच दिल्याचे तेव्हा उघड झाले होते. या हल्ल्यानंतर अनेक महिने यात सौदी सरकारच्या भूमिकेविषयी ब्रही काढली नाही.  

जनतेला भावनिक आवहान...
९/११ चा हल्ला हा अमेरिकन जनतेसाठी भावनिक मुद्दा करण्याचे प्रयत्नही वॉशिंग्टनच्या सौदी अरब दूतावासातून रीतसर करण्यात आले होते. यासाठी स्वतंत्र प्रचारकांना लाच देण्यात आली होती. जनतेला सर्व प्रकरण पारदर्शक वाटावे यासाठीदेखील योजनाबद्ध प्रयत्न झाले. देशप्रेम, अमेरिकन संरक्षण यंत्रणेचे कर्तृत्व, मृतांना श्रद्धांजली असे भावनिक मुद्दे व्यापक स्वरूपात मांडण्यात आले.  

९/११ च्या हल्लेखोरांत १५ फिदायीन सौदी
वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यामध्ये १९ फिदायीन हल्लेखोरांपैकी १५ सौदी अरेबियाचे होते. या हल्ल्याचा सूत्रधार आेसामा बिन लादेन हा सौदीत जन्मलेला होता. या हल्ल्यांमध्ये ३००० अमेरिकनांचा बळी गेल्यानंतरही दाद मागता आलेली नाही. हा भावनिक मुद्दा असून नवा कायदा अमलात आल्यास राजकारणी आणि लॉबिस्ट गोत्यात येण्याची शक्यता आहे.

प्रायोजित दहशतवादविरोधी कायद्याला विरोध 
आजही अमेरिकेत प्रायोजित दहशतवादविरोधी कायद्याला विरोध करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना किती पैसा आणि कुणाकडून देण्यात आला होता हे अद्याप उघड झालेले नाही. लाच घेणाऱ्यांनी केंद्रीय प्रतिनिधिगृहातील सदस्यांचे मतपरिवर्तन करण्यात सौदी अरेबियाच्या सरकारची मदत केली होती. सामान्य जनतेला परकीय प्रभावाची गंधवार्ताही लागू दिली नाही. आेबामा प्रशासनाच्या काळात हा कायदा संमत करून घेण्यासाठी प्रतिनिधिगृहात बहुमत पडले होते. मात्र अद्याप कायदा अमलात आलेला नाही. 

अमेरिकन राजकारण्यांवर परदेशी प्रभाव 
अमेरिकन राजकारण्यांवर परदेशी प्रभाव यामुळे सिद्ध होतो. पर्यायाने परकीय लॉबिस्ट अमेरिकी धोरणांवर सखोल परिणाम सोडत आहेत. त्यातही परकीय उच्चपदस्थ आणि राज्यकर्ते सहज अमेरिकेत पैशाच्या बळावर लॉबिंग करू शकतात, असे टेक्सास विद्यापीठाच्या विधी प्रोफेसर आणि अभ्यासक स्टीफन व्हलाडेक यांनी म्हटले आहे.  
बातम्या आणखी आहेत...