आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याच नराधमाच्या घरात सापडले 8 तरुणींचे हात, पाय अन् मुंडके; असा लागला पत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - जपानची राजधानी टोक्योतील एका युवकाच्या घरातून तरुणींचे बॉडी पार्ट्स सापडले आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. 8 तरुणी आणि 1 तरुणाचे असलेले बॉडी पार्ट्स तुकड्यांमध्ये ठेवण्यात आले होते. प्रत्येक बॉडीचे छोटे-छोटे तुकडे वेग-वेगळ्या बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. फ्लॅटच्या मालकाचे नाव तकाहिरो शिरैशी असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तकाहिरोने आपला गुन्ह्याची कबुली दिली आहे.

असा झाला खुलासा...
- 20 सप्टेंबर रोजी एका 23 वर्षीय तरुणीने ट्वीट करून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. कुणी माझ्यासोबत मरू इच्छित असले तर माझ्याशी संपर्क साधा असेही तिने लिहिले होते. 
- दुसऱ्या दिवशी ती तरुणी गायब झाली. तरुणीच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि तेव्हापासूनच पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. 
- अखेर, पोलिस त्या मुलीशी संवाद करणाऱ्या तकाहिरो पर्यंत पोहोचले. त्याच्या फ्लॅटवर धाड टाकल्यानंतरच पोलिसांना सर्व मृतदेहांचे तुकडे सापडले आहेत. 

रेप करून पैश्यांसाठी केले मर्डर
- फ्लॅटमधून बॉडी पार्ट्स सापडताच आरोपीने आपले कृत्य मान्य केले. तो मुलींशी मैत्री करून त्यांना आपल्या घरी बोलवायचा असे त्याने सांगितले आहे. 
- घरी बोलावल्यानंतर तो तरुणींवर दमदाटी करून लैंगिक अत्याचार करायचा यानंतर पीडितांना ठार मारत होता. खून करून तो तरुणींकडील दागिने आणि रक्कम लुटत होता. 
- पोलिसांनी दारातच ठेवलेल्या कुल बॉक्सेसमधून बॉडी पार्ट्स जप्त केले आहे. या मोठ-मोठ्या बॉक्समध्ये हात, पाय, मुंडके आणि इतर बॉडी पार्ट्स तुकड्यांमध्ये ठेवण्यात आले होते. 
- तकाहिरो बॉडी पार्ट्स फेकण्यासाठी सोपे जावे, म्हणून त्यांचे तुकडे करून ठेवत होता. या तुकड्यांमध्ये बेपत्ता झालेल्या मुलीचा देखील समावेश होता. 
- त्याच्या फ्लॅटमधून सापडलेल्या इतर तरुणींचे आणि एका तरुणाचे मृतदेह खूप छोट्या तुकड्यांमध्ये आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिस याबाबत सविस्तर तपास करत आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनास्थळावरील आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...