आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disturbing Baby Yoga Video On Facebook Goes Viral

हा कसला \'बेबी योगा\'? हृदय पिळवटून टाकणारा VIDEO आला समोर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'फेसबुक'वर 'बेबी योगा'च्या नावाखाली हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ अपलोड करण्‍यात आला होता. हा व्हिडिओ अल्पावधीतच व्हायरल झाला आहे. एक महिला विवस्त्र नवजात शिशुला पाणी भरलेल्या बादलीत बुडवताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर दोन्ही हातांमध्ये धरून ही महिला शिशुला झोके देत आहे. दरम्यान, नवजात शिशु जिवाचा आकांत करत हंबरडा फोडत आहे. व्हिडिओमधील महिला आणि शिशु कुठले आहेत, हे अद्याप समजलेले नाही.

नेटिजन्सकडून टिकेची झोड उठल्यानंतर मात्र 'फेसबुक'ने हा व्हिडिओ 'डिलिट' केला आहे.
दोन मिनिटांची व्हिडिओ क्लिप 'यू-ट्यूब'वरून अपलोड करण्यात आली आहे. इंडोनेशियामधून 'फेसबुक'वर ही क्लिप अपलोड झाल्याची माहिती मिळाली आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ पाहिला जात असून तो शेअर केला जात आहे.

'बेबी योगा' हा व्हिडिओ खूप दुःखदायक आणि वाह्याद असल्याच्या प्रतिक्रिया नेटिजन्सनी दिल्या आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, 'बेबी योगा'च्या नावाखाली फेसबुकवर अपलोड केलेला व्हिडिओ आणि फोटो...