आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे पाण्याखाली डायव्हिंग करताना येतो शहरात फेरफटका मारल्याचा अनुभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इजिप्तमधील शहर दहाबच्या संदर्भात असे म्हटले जाते की, हे शहर वाळंवटात असलेल्या सोन्याच्या नगरीप्रमाणे आहे. याचा अर्थ येथे सोन्याच्या खाणी आहेत, असा याचा अर्थ नव्हे. हे शहर वरून चमकताना दिसते, त्यापेक्षाही जास्त सुंदर आहे. येथे समुद्रातील पाण्यात खरी दुनिया आहे. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय छायाचित्रकारांनाही हे स्थळ छायाचित्रणाच्या दृष्टीने खूप उत्तम आहे, असे वाटते. 

- हे छायाचित्र इजिप्तमधील प्रसिद्ध छायाचित्रकार महंमद हकीम यांनी काढले आहे. ते इजिप्तच्या प्रकल्पावर काम करतात. जगासमोर या देशाची नव्या स्वरूपात ओळख करून देण्याची त्यांची इच्छा आहे. यासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले, येथील समुद्राच्या काही फूट अंतरावर नवा अनुभव मिळतो. रात्रीच्या वेळी आकाशात तारे खूप जवळ आल्यासारखे वाटतात. 

- दाहबमध्ये सर्व लोक एकमेकांना ओळखतात. यामुळे पर्यटकांशी येथे चांगली वर्तणूक होते. बाहेरील व्यक्ती त्यांच्याकडील वस्तू कोठेही ठेवू शकते. येथे चोरी होत नाही. पैसे संपले तर कोणत्याही रेस्तराँ, स्टोअरला नंतर पैसे दिले तरी चालतात. यामुळेच हे स्थळ खूप सुरक्षित मानले जाते.
बातम्या आणखी आहेत...