आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर 15 दिवसांनी कॅनडातून पाठवली घटस्फोटाची नोटीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक- लग्नाचे १५  दिवस उलटल्यानंतर पती कॅनडास पळून गेला आणि पत्नी सासू-सासऱ्याची सेवा करत राहिली. एक दिवस पोस्टाने तिला पत्र आले ते वाचताच तिची शुद्धच हरपली. तिला नवऱ्याने कॅनडातील न्यायालयाकडून घटस्फोटाची नोटीस पाठवलेली होती. 

पत्नीने ओंटेरियोचे वरिष्ठ  न्यायालय कॅनडा येथील मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहून घटस्फोट न देण्याविषयी पत्र दिले. न्यायमूर्तींनी तिची बाजू ऐकण्यासाठी खटला सुनावणीस ठेवला. पहिल्या सुनावणीत पीडितेस फोनवरून बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. न्यायमूर्तींनी पीडितेशी थेट बोलणी केली आणि बाजू ऐकून घेतली.
बातम्या आणखी आहेत...