आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असेही प्रशिक्षण - ब्रिटनमध्ये मातेला स्तनपान, पालनपोषणाचा सरकारकडून कोर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- चांगले पालक कसे व्हावे? मुलांमध्ये सभ्यपणा व शिष्टाचार कसा शिकवला जावा? त्यांची काळजी कशी घ्यावी?त्यांच्यात सकारात्मकता कशी रुजवावी? या सर्व प्रश्नांवरून पालक वर्ग चिंतातुर असतो. विशेषत: एकटे राहणाऱ्या कुटुंबांना ही समस्या भेडसावते. ब्रिटनमध्ये पालकांची ही समस्या दूर करून सक्षम पालक घडवण्यासाठी पॉझिटिव्ह पॅरेंटिंग कोर्स सुरू केला आहे. अभ्यासक्रमात मुलांचे कोडकौतुक कसे करावे, त्यांच्याशी कसे वागावे, आईस मातृत्व व स्तनपान करण्यास शिकवले जाते.
 
स्थानिक प्रशासन, चिल्ड्रन सेंटर, हॉस्पिटल व चर्च ग्रुप्सद्वारे हा कोर्स मोफत चालवला जात आहे. अनेक स्थानिक प्रशासन पालकांना घरीच कोर्स उपलब्ध करून देत आहेत. याशिवाय विविध खासगी संस्थाही पालकत्वाचा अभ्यासक्रम उपलब्ध करत आहेत. असे असले तरी पालक सरकारी कोर्सपेक्षा खासगी कोर्सला प्राधान्य देत आहेत. खासगी संस्था प्रति व्यक्ती ३३ हजार ते ८२ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारणी करत आहेत. यामध्ये दहा दिवस व १० आठवड्यांच्या कोर्सशिवाय ऑनलाइन कोर्सचाही समावेश आहे. इसेन्शियल पॅरेंट कंपनीच्या संस्थापिका रिबिबा सिकोट म्हणाल्या, अन्न, धैर्य, प्रेम आणि भावनिक सहवास या मुलांच्या प्राथमिक गरजा आहेत. हे काही रॉकेट सायन्स नाही. प्रत्येक पालक हे सहज शिकू शकतो. या वर्गाचा उपयोग पालकांना आपले मूल समजून घेण्यात उपयाेगी ठरू शकते. मुलाच्या भावनिक जवळीकतेसाठी हे आवश्यक आहे. पालकांना सक्षम पालक बनवणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे.  व्हिक्टोरिया लुगटन दोन मुलांची आई आहे. तिने २५ हजार रुपयांत नॅशनल चाइल्ड बर्थ ट्रस्टमधून चार दिवसांचा पॅरेंटिग कोर्स केला आहे. याबाबत ती म्हणाली की, मी पहिल्यांदा आई झाले तेव्हा पालकत्वाची काहीच माहिती नव्हती. माझ्या मित्रालाही मुले नव्हती. 
 
मातृत्व नैसर्गिकच येते,असे लोक म्हणत. मात्र,मी आई झाल्यावर लोक माझ्या घरी आल्यानंतर काय म्हणतील या विचाराने मी चिंतेत होते. मला मुलाचे नॅपीही योग्य पद्धतीने ठेवता येत नव्हते. रात्री झोपताना कशा पद्धतीचे कपडे घालावे हेही मला माहीत नव्हते. किती कढत पाण्याने आंघोळ घालावी हे माहीत नव्हते. मात्र, मला चांगली आई व्हायचे होते. क्लास केल्यानंतर मला मानसिक शांतता मिळाली आणि त्याचा उपयोग झाला. माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी सक्षम पालकत्वासाठी पुढाकार घेतला होता. 
बातम्या आणखी आहेत...