आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंब कॅलिफोर्नियात, कंपनी सॅनफ्रान्सिस्कोमध्ये; दररोज विमानाने गाठतात कार्यालय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बरबंक (कॅलिफोर्निया) - सॅनफ्रान्सिस्कोची फिटनेस टेक कंपनी मोटिव्हचे सहसंस्थापक कर्ट वॉन बेडिंस्की यांनी घर आणि कार्यालयात संतुलन राखण्यासाठी केलेले प्रयत्न चर्चेत आले आहेत. बेडिंस्की रोज विमानाने कार्यालय गाठतात. कॅलिफोर्नियाच्या बरबंकमध्ये वास्तव्यास असलेले बेडिंस्की सॅनफ्रान्सिस्कोतील कार्यालयात जाण्यासाठी दररोज सुमारे १२५० किमींचा प्रवास करत आहेत. यासाठी ते ६ तास खर्ची घालतात.  
 
त्यांचा दिवस पहाटे ५ वाजता सुरू होतो. सकाळी १५ मिनिटांत बरबंक विमानतळावरील फ्लाइट पकडतात. ९० मिनिटांच्या प्रवासानंतर ते आेकलँड विमानतळावर उतरल्यानंतर हायब्रीड कारने सॅनफ्रान्सिस्कोला जाणे पसंत करतात. विमान प्रवासात बरेच कर्ब उत्सर्जन होत असल्यामुळे त्यांनी हा उपाय शोधला आहे. बेडिंस्की विमान प्रवासात वेळेचा सदुपयोगही करतात. प्रवासात त्यांची उद्योजकांसोबत चर्चा सुरू असते. यामध्ये स्टार्टअप उद्योजक, उपक्रमशील भांडवलदारांचा समावेश असतो. याशिवाय प्रलंबित कामे आटाेपण्यावर त्यांचा भर असतो. बेडिंस्की यांच्यानुसार, आपल्या व्यग्र दिनचर्येचा थकवा येत नाही. सुरुवातीस कार्यालयात जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. लॉस एंजलिसमध्ये ऊन तर सॅनफ्रान्सिस्कोमध्ये धुके व थंडी असते. अनेकदा वाहतुकीच्या कोंडीमुळे वेळ वाया जात होता. आता मात्र सकाळी ८.३० वाजता कार्यालयात पोहोचतो आणि सायंकाळी ५ वाजता कार्यालयातून बाहेर पडतो. ओकलँड विमानतळावर ७.० चे विमान पकडून ९ वाजेपर्यंत घरी पाेहोचतो. 
 
कुटुंब सॅनफ्रान्सिस्कोला घेऊन जाऊ शकत नव्हतो,
कंपनी घराजवळ आणणे शक्य नाही : बेडिंस्की  

बेडिंस्की म्हणाले, घरापासून दूर राहणे शक्य नाही. मी  कुटुंब सॅनफ्रान्सिस्कोला तर कंपनी बरबंकमध्ये आणू शकत नाही. कंपनीतील कर्मचाऱ्यांना रोज भेटणे  आवश्यक आहे तसेच कुटुंबालाही माझी गरज आहे. दोघांना समान महत्त्व देता यावे यासाठी मी हा पर्याय निवडला. या प्रवासासाठी त्यांना महिन्याला २३०० डॉलर(सुमारे १.५ लाख रु.) भरावे लागतात. यानंतर ते एका इंजिनाच्या विमानानेही प्रवास करू शकतात. विमानतळ प्रशासनाने त्यांची संपूर्ण चौकशी केली असल्यामुळे त्यांना वारंवार सुरक्षा तपासणीला सामोरे जावे लागत नाही. 
 
बातम्या आणखी आहेत...