आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वर्षीय मुलाचा नासाकडे नोकरीसाठी अर्ज; म्हणे, मी आहे ‘गार्डियन ऑफ द गॅलेक्सी’...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - नासाने काही दिवसांपूर्वी ग्रहमालेच्या संरक्षण अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याचे जाहीर करून जाहिरात काढली. पृथ्वीला वाचवण्याच्या जबाबदारीपोटी  सव्वा कोटींचे वार्षिक पॅकेज,असे नोकरीचे स्वरूप आहे. या पदासाठी अर्जाची मुदत १४ ऑगस्ट आहे. नासाकडे अर्जांचा पूर आला. यामध्येच जॅक डेव्हिसचाही अर्ज आला . नऊ वर्षाच्या या मुलाने जग वाचवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याला नोकरी मिळाली नाही, मात्र नासाने त्याला उत्तर पाठवले.
 
मी अंतराळ व परग्रहमानवाचे सर्व चित्रपट पाहिले, त्यामुळे मी ‘गार्डियन ऑफ द गॅलक्सी’ होऊ शकतो
प्रिय नासा, माझे नाव जॅक डेव्हिस. मी या पदासाठी अर्ज करू इच्छितो. नऊ वर्षाचा असलो तरी मी या पदासाठी योग्य आहे,असे मला वाटते. बहीण मला एलियन म्हणते. मी अंतराळ व एलियनशी संबंधित सर्व चित्रपट पाहिले. ‘गार्डियन ऑफ द गॅलक्सी’ चित्रपटही पाहिला. मी मार्व्हल्स एजंटस्् ऑफ शील्डचे सर्व शो पाहिले आहेत. लवकरच मॅन इन ब्लॅकही पाहणार आहे. मी युवा आहे त्यामुळे एलियनप्रमाणे लवकर शिकू शकतो.
तुमचा - जॅक डेव्हिस, इयत्ता चौथी
 
सव्वा कोटींचे वेतन, पृथ्वीला वाचवण्याचे काम
ग्रहविषयक संरक्षण अधिकाऱ्यास पृथ्वी व सौरमंडळामध्ये मानवाने केलेले प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्याला १,८७,००० डॉलर म्हणजे १,१९,०२,६६२ रु. वेतन व अन्य सुविधा मिळतील. अर्ज अमेरिकी नागरिकच करू शकेल. सरकारी सनदी सेवेत काम करणाऱ्यास कमीत कमी एक वर्षाचा अनुभव असायला पाहिजे.
 
पुढील स्लाइडवर वाचा, आम्हाला चांगल्या शास्त्रज्ञांची गरज आहे, तुम्ही शिक्षण घेऊन नासात याल अशी आशा आहे...
बातम्या आणखी आहेत...