आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्त राष्ट्रसंघात पहिल्यांदाच दीपोत्सव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्रे- प्रथमच संयुक्त राष्ट्रसंघात दिवाळी साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय प्रकाशाच्या रोषणाईत न्हाऊन निघाले होते. सोबतच दिव्याच्या छायाचित्रासोबत दिवाळीच्या शुभेच्छा देणारा संदेशही मुख्यालयाच्या इमारतीसमोर डिजिटल रूपात झळकत होता.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली. दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेचे अध्यक्ष पीटर थॉमसन यांनीही दिव्याच्या साथीने झळकत असलेले छायाचित्र ट्विटरवर अपलोड करून या प्रकाशमय सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. २९ ते ३१ ऑक्टोबरच्या काळात मुख्यालयावर अशीच रोषणाई राहणार आहे. दरम्यान, या काळात कोणतीही बैठक आयोजित न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

यापूर्वी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर अशाच प्रकारे संयुक्त राष्ट्र मुख्यालयावर रोषणाई करण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...