आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएनए चाचणीद्वारे सौंदर्य उपचार निश्चिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन (ब्रिटन) - पाश्चात्त्य देशांमध्ये सौंदर्य वर्धनासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर आता सर्वच मोठ्या शहरांतील ब्यूटी क्लिनिक्समध्ये सुरू झाला आहे. सौंदर्य उपचारांमध्ये आता डीएनए चाचणीचे तंत्र वापरून त्यांची दिशा निश्चित केली जात आहे. लंडन, बर्लिन, न्यूयॉर्क इत्यादी शहरांत डीएनए ब्यूटी क्लिनिक्स सुरू झाल्या आहेत. येथे सौंदर्य उपचारांपूर्वी डीएनए चाचणी केली जाते. याद्वारे शरीराला वा त्वचेला कोणत्या सौंदर्य उपचारांची गरज आहे हे ठरवले जाते. मुख्य म्हणजे येथे अानुवंशिक आजारांचेही निदान होते.

लंडनमध्ये जेनेयू नामक असेच क्लिनिक आहे. येथे ६ महिन्यांच्या उपचारांसाठी जवळपास ३ लाख रुपये खर्च येतो. कंपनी कोणालाही उपचार देण्यापूर्वी त्या व्यक्तीची डीएनए चाचणी करते. त्यानुसार कोणते क्रीम लावायचे हे ठरते. त्या व्यक्तीसाठी खास वेगळे क्रीम तयार केले जाते. डीएनए चाचणीद्वारे स्वत:विषयी माहिती घेऊन चिरतरुण राहण्यासाठी उपचार दिले जातात, असे कंपनीने सांगितले. या उपचारांना प्रतिसादही चांगला आहे.

या क्लिनिकमध्ये लाळेच्या नमुन्याची चाचणी केली जाते. याद्वारे मूलभूत डीएनए चाचणी केवळ अर्ध्या तासात होते. या नमुन्याला लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजमध्ये पाठवले जाते. तेथे ४८ तासांत याचे सविस्तर रिपोर्ट मिळतात. या चाचणीत अँटी ऑक्सिडंटची चाचणी होते. यावरून ध्यानात येते की व्यक्तीच्या त्वचेत किती प्रतिकारशक्ती आहे. त्यानुसार उपचार निश्चित केले जातात.
बातम्या आणखी आहेत...