आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णाविषयी अवमानजनक वक्तव्य पडले महागात, डॉक्टरांना ३.१८ कोटींचा दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हर्जिनिया - शस्त्रक्रियेच्या वेळी डॉक्टर मंडळी गुपचूप राहत नसावीत. त्यांच्यात काहीना काही गप्पा होत असतील. कदाचित रुग्णाच्या प्रकृतीविषयी, आजारपणाबद्दल. परंतु नेहमी असे होत नसते. अमेरिकेतील एका भूलतज्ज्ञाने शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारले. त्यामुळे त्यांना त्याचा ५ लाख डॉलरचा फटका (३.१८ कोटी रुपये) बसला.
ऑपरेशन थिएटरमधील ही गोष्ट बाहेर कशी आली? असे तुम्ही विचाराल. त्याचे कारण ठरले रुग्णाचा स्मार्टफोन. हा फोन चुकून सुरूच राहिला होता आणि तो रेकॉर्डिंग मोडवर होता. खरे तर कोलोनोस्कॉपीनंतर डॉक्टरांनी दिलेल्या सूचना लक्षात ठेवण्यासाठी त्याने तसे केले होते; परंतु डीबी नावाचा हा रुग्ण नंतर मोबाइल बंद करायचेच विसरून गेला होता. रुग्णाने नंतर स्मार्टफोनवर रेकॉर्डिंग ऐकण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना धक्काच बसला. भूलतज्ज्ञ टिफ्फानी इनगाम यांनी केलेली बडबड त्यात रेकॉर्ड झाली होती. ही महिला सर्जन म्हणाली, मला या रुग्णाच्या तोंडावर एक बुक्का मारावासा वाटतो. अगदी छोटा. हे ऐकून इतर सहकारी डॉक्टर हसू लागले. या चर्चेत प्रख्यात गेस्ट्रॉएंट्रॉलिजिस्टदेखील सहभागी होती. रुग्णाकडे पाहून ते त्याची टिंगल करू लागले. रुग्णाची विशिष्ट अवयव काढून टाका. टिफ्फानी यांनी तर कोणताच मुलाहिजा ठेवला नाही. रुग्णाला स्पर्श करू नका. त्यामुळे आपल्यालाही काही आजार होईल. रुग्णाच्या अवयवावरूनही टिफ्फानी यांनी अनेक आक्षेपार्ह शेरेबाजी केली. कोणी सुई दिल्यास त्याच्या हातात भोसकून टाकते, जेणेकरून तो अस्वस्थ होईल.

हे ऐकल्यानंतर डीबी नावाचा रुग्ण दु:खी झाला आणि त्याने सर्वांना धडा शिकवण्यासाठी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला. त्यात उपचारात दुर्लक्ष, रुग्णाशी गैरव्यवहार असा ठपका डॉक्टरांवर ठेवण्यात आला. दोन आठवड्यांपूर्वी याबद्दलची सुनावणी झाली.

फेअरफेक्स काउंटीच्या न्यायालयाने तक्रारीला वैध मानताना टिफ्फानी इनगाम यांना दोषी ठरवले आणि ५ लाख डॉलर (३.१८ कोटी रुपये) एवढा दंड ठोठावला. गेस्ट्रॉएंट्रॉलॉजिस्टविरोधात खटला दाखल करण्यात आला. ही शस्त्रक्रिया एप्रिल २०१३ मध्ये झाली होती. इनगाम यांनी निर्णयावर काहीही टिप्पणी केली नाही आणि त्या फ्लोरिडाच्या दिशेने रवाना झाल्या.