आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरचा प्रताप, प्रसव कळांनी विव्हळणाऱ्या महिलेसोबत घेतला सेल्फी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हेनेजुएला- कॉलेज कट्‍टावरून निघालेले 'सेल्फी'चे भूत आता नर्सिंग होमच्या लेबर रुममध्ये पोहोचले आहे. प्रसव कळांनी (लेबर पेन) विव्‍हळणार्‍या महिलेसोबत एका डॉक्टरने सेल्फी घेतल्याचा 'प्रताप' केला आहे. एवढे नव्हे, डॉक्टरने हा सेल्फी त्याच्या इस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. फोटोसोबत 'लेडी, आय कॅन डिलिव्हर युवर बेबी, बट फर्स्ट लेट मी टेक ए सेल्फी' (बाई, मी तुमची डिलिव्हरी करु शकतो. परंतु, त्याअाधी मला एक सेल्फी घेऊ द्या)' असे कॅप्शन दिले आहे.
डॅनियल सांचेज असे या डॉक्टरचे नाव असून त्याने इस्टाग्रामवर शेअर केल्या सेल्फीवर आता टिकेची झोड उठली आहे. नेटिजन्सनी डॉक्टरविरुद्ध कॅम्पेन सुरु करून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. डॉक्टरने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे.
डॅनियल सांचेज याने व्हेनेज्युएलामधील एका हॉस्पिटलमध्ये हा सेल्फी घेतला आहे. होता.
एका सामाजिक संस्थेने डॉ.डॅनियल सांचेजविरोधात 'ऑनलाइन पिटिशन कॅम्पेन सुरु केले आहे. कॅम्पेनला पाच हजारांहून जास्त लोकांनी पाठिंबा दिला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, अशाच प्रकारचे काही सेल्फी, त्यांच्यावर झाली होती कडाडून टीका...