आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन : प्रथमच 3D प्रिंटिंगद्वारे डिझाइन केली मानवी कवटी, यशस्वी प्रत्यारोपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्ये एका तीन वर्षीय मुलीची कवटी थ्री-डी प्रिंटिंगच्या मदतीने पुन्हा डिझाइन करून इम्प्लांट करण्यात आली आहे. वैद्यकीय इतिहासात प्रथमच असा प्रयोग झाल्याची चर्चा आहे.
'बिग हेड बेबी' नावाने प्रसिद्ध असलेली तीन वर्षीय हान हान हिचे डोके एका दुर्मिळ आजारामुळे सामान्य आकाराच्या तुलनेत चारपट मोठे होते. त्यामुळे ती अंध होण्याची आणि तिच्या मेंदूमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढली होती. चीनच्या हुनान प्रांतातील सेकंड पीपल्स हॉस्पिटलमध्ये बुधवारी 17 तास चाललेल्या सर्जरीनंतर डॉक्टरांनी आगामी काळात ही मुलगी पूर्ण बरी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. डॉक्टरांनी 3D प्रिंटिंगच्या मदतीने या मुलीच्या डोक्यात टायटॅनियम इम्प्लांट केले आह.

वेदनामुळे हान हान फार कासावीस व्हायची. ती 6 महिन्यांची असताना तिच्या या आजाराबाबत माहिती मिळाली होती. एका वर्षाची झाली तेव्हा तिच्या आईचाही मृत्यू झाला. डॉक्टरांनी तिला उपचारासाठी 40 ते 50 लाख लागतील असे सांगितले. नातेवाईकांची मदत आणि ऑनलाइन फंडींगद्वारे पैसे जमा केले आणि त्यानंतर ऑपरेशन करण्यात आले.

दुर्मिळ आजार
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीला जन्मापासूनच हाइड्रोसेफलस नावाचा दुर्मिळ आजार आहे. त्यात मेंदूतून एकसारखा फ्लूडचा स्त्राव होत असतो. पण हान हान हिची केस काहीशी वेगळी होती. तिच्या मेंदूत 85 टक्के फ्लूड जमा झाले होते. त्यामुळे तिच्या मेंदूवर दबाव वाढू लागला होता. त्यामुळे ब्रेन हॅमरेजची शक्यता वाढली होती. तसेच मेंदूत रक्तपुरवठाही कमी झाला होता.

पुढे काय?
जसे जसे वय वाढेल त्या प्रमाणात हानच्या डोक्याची हाडेही वाढतील. त्यामुळे टायटॅनियमची कवटी पूर्णपणे झाकली जाईल. तसेच मेंदूच्या विकासात अडथळा येऊ नये म्हणून हवी तेवढी जागाही सोडण्यात आली आहे.

अशी झाली सर्जरी
डॉक्टरांनी सीटी स्कॅनद्वारे डोक्याच्या एका एका इंचाची जागा ठरवली.
3डी प्रिंटरच्या मदतीने टायटॅनियमची कवटी बनवली.
मेंदू वर करून पाणी काढण्यात आले.
त्यानंतर यात गळालेला भाग वेगळा करून टाइटॅनियमची कवटी बसवली.
त्या कवटीत पुन्हा मेंदू ठेवला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, हान हान चे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...