आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदी अरेबियातील क्रूरता, छुप्या कॅमे-यात कैद झाली भयावह स्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात कडक नियम-कायदे असलेला देश सौदी अरेबियाच्या अंतर्गत स्थितीवर एक डॉक्यूमेण्‍ट्री आज (मंगळवार) प्रेक्षपित केले जाणार आहे. गुप्त पध्‍दतीने चित्रित करण्‍यात आलेल्या या डॉक्युमेण्‍ट्रीत फाशी आणि क्रेनवर लटकवलेले मृत्यदेह दिसत आहे. या चित्रपटाचे नाव 'सौदी अरेबिया अनकव्हर्ड' असे आहे. ते सार्वजनिक प्रसारण सेवा आयटीव्हीवर दाखवले जाणार आहे. सौदीत लोकशाही कार्यकर्त्याच्या मदतीने सहा महिने विविध घटनांचे चित्रिकरण करण्‍यात आले. रियाधच्या 'चॉप चॉप स्क्वेअर' वर गुन्हेगारांचे शिरच्छेद केले जाते...
- यात लूटमारी करणारे पाच गुन्हेगारांचे शिरच्छेद करुन त्यांचा मृतदेह क्रेनला लटवण्‍यात आले आहे. अने‍क दिवस त्यांचे मृतदेह अशीच लटकलेली दिसतात.
- आपल्या सावत्र नातीला मारल्याच्या आरोपाखाली एका महिलेचा सार्वजनिक ठिकाणी शिरच्छेद करण्‍यात आला आहे. गुन्हा न केल्याचा ती महिला सांगत होती.
- डॉक्यूमेण्‍ट्रीत राजधानी रियाधच्या 'चॉप चॉप स्क्वेअर'ही दाखवला आहे. येथे शिरच्छेद करुन शिक्षा दिली जात असल्याने यास 'चॉप चॉप स्क्वेअर' असे नाव पडले आहे.
- या चित्रपटात तेलाने समृध्‍द देशातील श्रीमंती आणि गरिबीही नजरेला पडते.
ब्रिटन-सौदी संबंधावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित
- या डॉक्युमेण्‍ट्रीत दाखवले आहे, की ब्रिटन आणि सौदी अरेबियाचे संबंध खूप जवळचे आहेत. क्षुल्लक गुन्ह्यांसाठी येथे दीर्घकाळ तुरुंगवास, चाबूकाचा मार, दगड मारणे आणि शिरच्छेद सारख्‍या शिक्षा दिल्या जातात. येथे प्रत्येक दिवशी एका व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते.
- येथील धार्मिक पोलीस रस्ते आणि शॉपिंग मॉलमध्‍ये गस्ती घालत असतात. ईश्‍वर निंदा केल्यास दगड मारणे किंवा शिरच्छेद करुन शिक्षा दिली जाते. चोरी केल्यास हात कापले जाते. जर कोणी इस्लामचा अपमान करत असेल तर त्याला दहा वर्ष तुरुंगवास किंवा 1 हजार चाबूकाचा मार दिला जातो.
कोणी बनवली डॉक्युमेण्‍ट्री
- डॉक्युमेण्‍ट्री हार्डकॅश प्रोडक्शन्सने बनवले आहे. 1992 मध्‍ये डेविड हेनशॉने ही कंपनी सुरु केली होती. चालू घडामोडींवर शोध चित्रपटांची निर्मिती करणा-या 'हार्डकॅश'ला तीन वेळा अॅमी अॅवॉर्ड आणि रॉयल टेलिव्हिजन सोसायटी जर्नलिझम पुरस्काराने सन्म‍ानित करण्‍यात आले आहे.

वादात अडकले होते आयटीव्ही ब्रॉडकास्ट सर्व्हिस
- 35 वर्षांपूर्वी एक सौदी राजकुमार आणि तिच्या प्रियकराच्या हत्येचा चित्रपट बनवून चॅनलवर प्रेक्षपित केल्याने आयटीव्ही चर्चेत आले होते. यानंतर सौदीतील ब्रिटिश राजदूताला काढले गेले. व्यापार ठेका रद्द करण्‍यात आले होते. यानंतर आजपर्यंत या ब्रिटिश टेलिव्हिजन दाखवले गेले नाही.
पुढील स्लाइड्स पाहा, व्हिडिओतून घेतले काही छायाचित्रे...