आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलच्या पंतप्रधानांचा कुत्रा अटकेत, मंत्री-खासदारांना घेतला चावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येरूसलेम - इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू यांच्या पाळीव कुत्र्याला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत या कुत्र्याने अनेकांना चावा घेतल्याचे समोर आले आहे. त्यात खासदार आणि मंत्र्यांचाही समावेश होता. नेतन्याहू यांनी स्वतः शनिवारी फेसबूक पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली.
पंतप्रधानांनी केलेल्या पोस्ट
- बुधवारी एका कार्यक्रमादरम्यान इस्रायलच्या पंतप्रधानांच्या कुत्र्याने उपपरराष्ट्र मंत्र्यासह दोन पाहुण्यांना चावा घेतला होता. या कुत्र्याचे नाव काइया असल्याचे सांगितले जात आहे.
- यहुदी फेस्टिव्हल 'हन्नुकाह' च्या निमित्ताने पंतप्रधानांच्या निवासस्थानी पार्टी देण्यात आली होती. यादरम्यान कुत्र्याने नेतन्याहू यांच्या लिकुड पार्टीतील खासदार शरीन हॉस्केल यांनाही चावा घेतला होता.

रेस्क्यू होममधूम आणला होता कुत्रा
- सुत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधानांच्या मुलाने यावर्षीच जुलै महिन्यात एका रेस्क्यू होममधून हा कुत्रा आणला होता.
- ऑगस्टमध्ये पंतप्रधानांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट करत डॉग लव्हर्ससाठी लिहिले होते की, तुम्हाला याचा पश्चाताप होणार नाही.
- नेतन्याहू यांचा हा कुत्रा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरींसह अनेक दिग्गजांना भेटला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा या कुत्र्याचे काही PHOTOS
बातम्या आणखी आहेत...