आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SHOCKING : -32 °C तापमानात कुत्र्यावर पाणी टाकून गोठण्यासाठी सोडून दिले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - श्वान माणसाचा सच्चा मित्र असो असे म्हटले जाते. पण, काहींना याची काहीच किंमत नाही. माणसापेक्षा क्रूर जगात काहीच नसल्याची जाणीव करून देणारी हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रशियाच्या सायबेरियातील एका नराधमाने आपल्याच कुत्र्याला (मादा श्वान) ठार मारण्यासाठी त्याच्या अंगावर पाणी टाकून बाहेर सोडून दिले. सायबेरियात सध्या जगातील सर्वात थंट उणे 32 अंश सेल्सियस तापमान आहे. इतकी थंडी, की हवेत गरम पाणी फेकल्यास जमीनीवर त्याचे बर्फाचे तुकडे पडत आहेत. अशात त्या व्यक्तीने कुत्र्याच्या अंगावर पाणी फेकून सोडल्याने त्याच्या शरीरावरील पाण्याचे बर्फ झाले. आपल्याच शरीरावरील बर्फात कैद झालेला श्वान हायपोथर्मियाने काही मिनिटांतच दगावला.

 

प्राणी मित्रांच्या संतप्त प्रतिक्रिया
द सायबेरियन टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, याकुत्स्क शहरातील ही घटना आहे. प्राणी मित्रांच्या या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यापैकीच एकाने सांगितल्याप्रमाणे, आज त्या नराधमाने आपल्या श्वानला बाहेर सोडले. उद्या त्याच्या लेकरांसोबत असे घडू शकते. दुसऱ्या एका महिलेने त्या श्वानाचे डोळे कायम आपल्या स्मरणात राहून खुपतील अशी प्रतिक्रिया दिली. एखाद्या व्यक्तीला जगायचे आहे, तरीही तो मरत असताना त्याच्या डोळ्यात जसे भाव येतात तशाच भावना त्या श्वानाच्या डोळ्यात तिला दिसल्या आहेत. लोकांचा वाढता संताप पाहता खासदारांनी याची दखल घेतली. स्थानिक खासदारांनी त्या व्यक्ती विरोधात खटला दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...