आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वान तस्करी, जॉनी डेपची पत्नी कायद्याच्या कचाट्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस - काही दिवसांपूर्वी हॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता, अभिनेता जॉनी डेपला पूर्वपरवानगीशिवाय ऑस्ट्रेलियात पाळीव श्वान आणल्याप्रकरणी ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले होते. आता जॉनीची पत्नी अॅम्बर हर्डवर ऑस्ट्रेलियन प्रशासनाने श्वान तस्करीचा दावा ठोकला आहे. २९ वर्षीय अॅम्बरने एप्रिलमध्ये यॉर्कशायर प्रजातीचे दोन पाळीव श्वान खासगी विमानाने ऑस्ट्रेलियात आणले. ती ब्रिस्बेन येथे वास्तव्यास असताना ऑस्ट्रेलियन प्रशासनाच्या हे निदर्शनास आले. आता अवैधरीत्या श्वानांना आणल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आलाय. खोटी कागदपत्रे सादर केल्याचाही तिच्यावर आरोप आहे. अॅम्बरला ७ सप्टेंबर रोजी क्वीन्सलँड न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली. तिला १० वर्षे कैद व ४८ हजार अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी डेपवर आरोपपत्र का दाखल केले नाही, या प्रश्नाचे उत्तर देण्यास सरकारी वकिलांनी नकार दिला. सध्या जॉनी डेप आपल्या ‘पायराइट्स ऑफ द कॅरिबियन’च्या चित्रपटासाठी ऑस्ट्रेलियात आहे.
बातम्या आणखी आहेत...