आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वपक्षीयांकडूनच धोका होण्याची ट्रम्प यांना शंका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लास वेगास - अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीचे रिपब्लिकन पक्षाचे दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांना आता आपल्याच पक्षाकडून धोका होण्याची शंका वाटत आहे. रिपब्लिकन पक्षाने मला मदत केली तर ती मोठी मदत ठरेल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

१६ दावेदारांना हरवून ट्रम्प हे अध्यक्षपद निवडणुकीच्या तिकिटासाठी एकटेच मैदानात आहेत. पण ट्रम्प यांना तिकीट मिळू देणार नाही, असे त्यांच्याच पक्षाचे प्रमुख लोक म्हणत आहेत. त्यावर लास वेगासच्या ट्रेशर आयलंड हॉटेलमध्ये ट्रम्प म्हणाले की, मी अध्यक्षपद निवडणूक लढावी, असे कुंठित रिपब्लिकन्सना वाटत नाही. पक्षाने सहकार्य केले नाही तर देणग्या गोळा करण्याची मोहीम थांबवू, असा इशारा देताना ट्रम्प म्हणाले की, काही लोक वाईट पद्धतीने हरले आहेत. आता जुलैच्या कन्व्हेन्शनमध्ये मला पूर्ण प्रतिनिधी मिळू नयेत यासाठी ते कट रचत आहेत. ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर टिप्पणी करण्यास रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शन कमिटीच्या प्रवक्त्याने नकार दिला आहे.

जुलै कन्व्हेन्शनमध्ये उमेदवार निश्चिती
रिपब्लिकन पक्ष अध्यक्षपद निवडणुकीतील उमेदवार १८ ते २१ जुलैदरम्यान होणाऱ्या कन्व्हेन्शनमध्ये निश्चित करणार आहे. सध्या तरी ट्रम्प यांनी उमेदवारीसाठी आवश्यक प्रतिनिधी मिळवले आहेत. आतापर्यंत ट्रम्प आपल्या विरोधकांचा कट म्हणजे माध्यमांनी रचलेल्या कहाण्या अशी टिप्पणी करत होते. पण पहिल्यांदाच त्यांनी खुली टिप्पणी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...