आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाच्या धमकीवर डोनाल्ड ट्रम्प भडकले; भयंकर विध्वंस करण्याचा अमेरिकेचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यू जर्सी/बीजिंग- अमेरिका आणि उत्तर कोरियादरम्यान तणाव वाढत असून उ. कोरियाच्या धमक्यांवर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भडकले. त्यांनी बुधवारी आपली भूमिका अधिक कठोरपणे व्यक्त केली. ट्रम्प यांनी इशारा दिला की, उत्तर कोरियाने धमक्या देणे थांबवावे, अन्यथा प्रचंड विध्वंस होईल. जगाने कल्पनाही केली नसेल इतकी हानी उ. कोरियाची केली जाईल. ट्रम्प यांनी न्यू जर्सीमध्ये म्हटले की, उत्तर कोरियासाठी धमक्यांना आवर घालणे हाच मार्ग योग्य ठरेल. मात्र, यानंतर उ. कोरियाने गुआममध्ये अमेरिकी स्थानकावर हल्ला करण्याची धमकी दिली.  

गोपनीय अहवालानुसार, किम जोंग उन सरकारने एक छोटे अण्वस्त्र तयार केले आहे. क्षेपणास्त्राद्वारे याचे प्रक्षेपण करता येते. यापूर्वी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने शनिवारी सर्वानुमते उ. कोरियावर नवे निर्बंध लादले होते. यामुळे उ. कोरियाची एकतृतीयांश निर्यात खंडित होईल. त्यांना वार्षिक एक अब्ज डॉलर्सचे नुकसान सोसावे लागेल. प्याँगयांगने या निर्बंधांवर टीका केली असून अमेरिकी भूभागावर हल्ल्याची धमकी दिली.  

गुआम शस्त्रसज्ज
अमेरिका गुआममध्ये शस्त्रास्त्र साठा वाढवत आहे, उ. कोरियाचा आरोप : उ. कोरियाने म्हटले आहे की, ८ ऑगस्टच्या सकाळी गुआमच्या चाच्यांनी द. कोरियाच्या वायुक्षेत्रात युद्धसज्जतेसाठी पुन्हा मॅड कॅप  कवायती केल्या. त्यांनी आरोप केला की, अमेरिका गुआममध्ये क्षेपणास्त्र साठा वाढवत आहे. उ. कोरिया गुआमच्या आसपास मध्यम ते लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र रॉकेट हुसोंग-१२ च्या प्रक्षेपणाची तयारी करत असल्याचेही गोपनीय सूत्रांकडून कळते.  गुआम येथे अमेरिकेचे अँडरसन वायू स्थानक आहे. अण्वस्त्र क्षमतेचे बी-१ बी बॉम्ब वर्षाव करण्यासाठी ते सज्ज आहे. मंगळवारी कोरियाच्या द्वीपकल्पात अमेरिकेने हे पुन्हा पाठवले असल्याचेही वृत्त आहे.
बातम्या आणखी आहेत...