आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत मुस्लिमांना प्रवेशबंदी लादा, ट्रंप यांच्‍या व्‍यक्‍तव्‍याने नवा वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेतील उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेत मुस्लिमांना प्रवेश बंदी लादण्याची मागणी करून नव्या वादाला तोंड फोडले. कॅलिफोर्नियातील गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. ट्रंप यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी त्यांच्यावर टीका केली आहे. व्हाइट हाऊसने या विधानास गैरअमेरिकी ठरवले. वाढत्या विरोधानंतर ट्रंप यांनी माघार घेतली. त्यांनी टि्वटरवर म्हटले की, मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांना घटनात्मक अधिकाऱ्यांचे समर्पण हवे आहे, मात्र मला आयएसआयएसने शरण यावे असे वाटते.

राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी देशात प्रवेश करणाऱ्या नागरिकांसाठी धार्मिक अडथळा नाकारला होता. यानंतर ट्रंप यांनी वरील वक्तव्य केले. कॅलिफोर्नियामध्ये गोळीबार करणाऱ्या अतिरेकी जोडप्यामध्ये कट्टरतावाद भिनवण्यात आल्याचे सांगण्यात येते. कॅलिफोर्नियात आयोजित सभेत ट्रंप यांनी आवश्यक सुरक्षात्मक पावले न उचलल्यास ९/११ सारखा हल्ला होण्याचा इशारा दिला.
वक्तव्य द्वेषपूर्ण, पूर्वग्रहदूषित : हिलरी क्लिंटन
उमेदवारीच्या स्पर्धेतील अन्य उमेदवारांनी ट्रंप यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. डेमाेक्रॅटिक पक्षाकडून इच्छुक उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी ट्रंप यांची भूमिका द्वेषपूर्ण, पूर्वग्रहदूषित आणि फुटीरतावादी असल्याचे म्हटले आहे. यामुळे आपण कमी सुरक्षित राहू. ट्रंप यांचे वक्तव्य अमेरिकी मूल्य आणि हिताच्या विरोधात आहे. ते अमेरिकेचे कुटिल पद्धतीने विभाजन करत असल्याचे व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जोश अर्नेस्ट यांनी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले.
महापौरांकडून ट्रंप यांना प्रवेशबंदी
ट्रंप यांच्या धर्तीचर सेंट पीटर्सबर्गचे महापौर रिक क्रिसमॅन यांनी टि्वटवर म्हटले की, ट्रंप यांच्याकडून निर्माण झालेला धोका समजून घेईपर्यंत त्यांच्या सेंट पीटर्सबर्ग प्रवेशावर आम्ही बंदी घालत आहोत. तासाभरात याचे १२०० वेळा रिटि्वट करण्यात आले. दरम्यान, ट्रंप गेल्या महिन्यापासून द्वेष पसरवून भेदभाव निर्माण करत असल्याचे अमेरिकन इस्लामिक रिलेशन्सने (सीएआयआर) म्हटले आहे.
ट्रंपकडून सर्वेक्षणाचा दाखला
ट्रंप यांनी आपल्या वक्तव्याच्या समर्थनार्थ विविध सर्वेक्षण अहवालांचा दाखला दिला. त्यात अमेरिकी नागरिकांमध्ये मुस्लिमांबद्दल वाढणारी द्वेषभावना अमेरिकेला संकटात नेऊ शकते, असे म्हटले आहे. अमेरिकी नागरिकांमध्ये असे मत का तयार झाले, हे जाणून घेणे आवश्यक आहे. आपण ही समस्या समजून घेतल्याशिवाय आपला देश अशा हल्ल्याला बळी पडणार नाही. हल्लेखोरांना मानवी जीवनाविषयी आदर नाही, असे ट्रंप यांनी नमूद केले आहे.
बातम्या आणखी आहेत...