आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेरमतमोजणी घेणे हा तर घोटाळाच : डोनाल्ड ट्रम्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - विस्कॉन्सिन या राज्यांत फेरमतमोजणी करण्याचा निर्णय म्हणजे घोटाळा आहे, अशी टिप्पणी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अध्यक्षपद निवडणुकीतील निकालाला आव्हान देण्याऐवजी त्याचा आदर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

ग्रीन पार्टीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार जिल स्टेन यांच्या मागणीनंतर विस्कॉन्सिन राज्यात फेरमतमोजणी होत आहे. त्यांची मागणी निवडणूक आयोगाने मान्यही केली आहे. स्टेन यांनी मिशिगन आणि पेनसिल्व्हेनिया या आणखी दोन राज्यांतही फेरमतमोजणीची मागणी केली आहे. आठ नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीत पेनसिल्व्हेनिया आणि विस्कॉन्सिन या दोन राज्यांत ट्रम्प यांनी हिलरी यांच्यावर अत्यंत कमी मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. मिशिगनमधील विजयाचे अंतरही खूपच कमी आहे. फेरमतमोजणीसाठी आपण ग्रीन पार्टीसोबत आहोत, असे हिलरींच्या प्रचार मोहिमेतर्फेही सांगण्यात आले होते. ट्रम्प यांनी इलेक्टोरल व्होट जिंकले आहेत. पण हिलरींना २० लाख पॉप्युलर व्होट जास्त मिळाली आहेत.

निवडणुकीत घोटाळा होत आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला होता. आता मात्र त्यांनी निकालाला आव्हान देण्यापेक्षा त्याचा आदर करावा, असे आवाहन केले आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, लोकांनी मते दिली आहेत. आता निवडणूक संपली आहे. हिलरी क्लिंटन यांनीही निवडणुकीच्या रात्री निकालानंतर पराभव स्वीकारल्याची कबुलीही दिली आहे. जिल स्टेन यांना एकूण एक टक्का मते मिळाली आहेत. काही राज्यांत तर त्यांची पाटी कोरीच आहे. त्यांनी आपली तिजोरी भरण्यासाठी फेरमतमोजणीच्या नावाखाली ५.९ लशलक्ष डॉलर्स गोळा केले आहेत. त्या ही रक्कम फेरमतमोजणीसाठी खर्चच करणार नाहीत. तिन्ही राज्यांत आम्हाला मोठ्या मत फरकाने विजय मिळाला आहे. पेनसिल्व्हेनियात तर आम्हाला ७० हजारांपेक्षा जास्त मतफरकाने विजय मिळाला, असे ट्रम्प यांनी नमूद केले.

पुढे वाचा, ट्रम्प यांचा आरोप ग्रीन पार्टीने फेटाळला...
बातम्या आणखी आहेत...